The person who threatened Deepak Kesarkar was arrested : दीपक केसरकर यांना धमकी देत पैश्यांची मागणी करणाऱ्या प्रदीप भालेकर याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, भाजपचे नितीन गडकरी यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना खंडणीची धमकी देणाऱ्या प्रदीप भालेकरला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, काही दिवसांपूर्वी प्रदीप भालेकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीकडे 45 हजार रुपयांची मागणी केली होती. या कारणावरून दीपक केसरकर यांच्या कार्यालयाच्या वतीने प्रदीप भालेकर यांच्या विरुद्ध मुंबई पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी प्रदीप भालेकर याला सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.
https://thepointnow.in/bachhu-kadu-press-conference/
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दीपक केसरकर यांची सोशल मीडियावर बदनामी न करण्याच्या बदल्यात भालेकर यांनी खंडणी मागितल्याचं निष्पन्न झाला आहे. व या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.
दरम्यान, दीपक केसरकर यांनी देखील प्रदीप भालेकर आर्थिक मदत केली होती. काही दिवसानंतर केसरकरांनी मदत देण्यास थांबविली, त्यानंतर प्रदीप भालेकर तुमची माहिती उघड करतो, अशी धमकी देत होता. अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
एकीकडे राज्यातील राजकारण दिवसागणिक वेगळे वळण घेत असताना दुसरीकडे विविध पक्षातील ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांना जीवे मारण्याच्या किंवा खंडणीसाठीच्या धमक्या वाढत असल्याने राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर कविता लावले जात आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम