Nashik news | शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे आंतरपीक म्हणून गांजा शेतीवर स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखा आणि शिरपूर पोलीस पथकाने छापा टाकून ७२१ किलो ४०० ग्रॅम वजनाचा व तीन कोटी दहा हजार रूपये किंमतीचा ओला गांजा जप्त केला आहे. पोलिसांच्या ह्या छाप्यानंतर गांजाची शेती करणारे दोघेजण पसार झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई सांगितली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच एक कोटींचा गांजा शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला होता. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शिरपूर मधील लाकड्या हनुमान येथे एका शेतात गांजाची लागवड असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर शिरपूर पोलिसांनी एक पथक तयार केले.
देवळा तालुका दुष्काळी जाहीर न झाल्याने उद्यापासून काँग्रेस करणार आमरण उपोषण
काल संध्याकाळी तेथे छापा टाकला असता, शेतात तूर, मका आणि कापुस या पिकाच्या मध्यभागी अंदाजे तीन ते सहा फुट उंचीचे एकुण ४८७ गांजाची रोपं सापडली. याप्रकरणी गांजा लागवड करणारे मोहन शामा पावरा आणि भावसिंग भोंग्या पावरा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे फरार आहेत.
धुळे जिल्ह्यातील गांजाच्या शेतीवर केलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अवैधरित्या गांजाची लागवड करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कसमादे | कांद्याची कोटींची उड्डाणं घेणाऱ्या कसमादेवर कांदा न पिकवण्याची वेळ!
एक कोटींचा गांजा जप्त
काही दिवसांपूर्वी शिरपूर पोलिसांच्या पथकाने ५६ लाख आठ हजार ७५० रुपयांची एक हजार ६०२ किलो गांजाची तीन ते सहा फुट उंचीची झाडं जप्त केली होती. दरम्यान, त्याचदिवशी दुसऱ्या एका घटनेत देखील पोलिसांनी कारवाई करत गांजाची झाडे जप्त केली होती. एकात ५० लाख तर, दुसऱ्या घटनेत ५६ लाखांचा माल आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकट्या शिरपूर तालुक्यात एक कोटींचा गांजा जप्त करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम