Viral News | देशभरात दिवाळीचा उत्साह दिसत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नुसती लगबग असते. अनेकदा फटाके फोडताना हुल्लडबाजीचे प्रकार घडत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. ज्यामध्ये काही तरुणांनी चक्क धावत्या स्कॉर्पिओ कारवर फटाके फोडल्याचे दिसत आहे.
फटाके हे ज्वलनशील पदार्थ असतात. ते वाजवताना काही काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. पण, काही अतिउत्साही आणि हुल्लडबाज तरुण याकडे दुर्लक्ष करुन स्वतःसह इतरांना इजा पोहोचवत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही अतिउत्साही तरुणांनी चक्क धावत्या स्कॉर्पिओ गाडीवर फटाके लावण्याचा प्रताप दिसत आहे.
Malegaon | अद्वय हिरे यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
या विडियो मध्ये दिसत आहे की, तया रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असून, काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ सुसाट वेगात धावत आहे. या गाडीवर काही हुल्लडबाज तरुणांनी फटाके पेटवले असून, धावत्या कारवर हे फटाके फुटत असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे चालू गाडीवर फटाके फोडण्याचा जीवघेणा स्टंट पाहून सर्वच स्तरांवरून या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी, या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी काही जणांनी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसही या तरुणांचा शोध घेत आहेत. या स्कॉर्पिओ चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासत आहेत.
Nashik | नाशिक गारठलं! यंदाच्या हंगामातील निच्चांकी किमान तापमानाची झाली नोंद
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम