Crime News | लहान मुलं हे प्रचंड हट्टी असतात, त्यांना हवी असलेली गोष्टी नाही मिळाली तर, ते काय करतील याचा काहीच नेम नसतो. पण, असं एखादी मोठी जबाबदार व्यक्ती वागली तर? ही घटना घडलीय नागपूरमध्ये या प्रकारामुळे आता सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे.
नागपुरातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर वेळेत चहा-बिस्कीट न मिळाल्याने शस्त्रक्रिया सोडून आरोग्य केंद्रातून थेट निघून गेल. धक्कादायक बाब म्हणजे, पुढील ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती. तसेच, रुग्णांना अॅनेस्थिशियादेखील देण्यात आलेला होता. दरम्यान, डॉक्टरच्या या कृत्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
देवळा | माजी आमदार कोतवाल यांच्या मध्यस्थीने देवळ्यातील आमरण उपोषण मागे
नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली आहे. शस्त्रक्रिया नियोजित होती, त्यानुसार सगळी तयारीही करण्यात आली होती. चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया होणार होती. डॉक्टरही आरोग्य केंद्रात वेळेवर आले. पण, त्यांना वेळेत चहा-बिस्कीट मिळालं नाही म्हणून डॉक्टरांना राग अनावर झाला व डॉक्टर आरोग्य केंद्रातून तडकाफडकी थेट निघून गेले.
डॉक्टरांच्या या कृत्याचा त्रास विनाकारण ह्या चारही महिला रुग्णांना सहन करावा लागला. शुक्रवारी (3 ऑक्टोबर) रोजी ही घटना घडली. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांनी पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी, दोषी डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांना चहा बिस्कीटची गरज होती. त्यामुळे वेळेत चहा-बिस्कीट न मिळाल्यामुळे ते निघून गेल्याचं चौकशीतून समोर आलं असल्याचं डॉ. भलावी यांनी सांगितलं आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करून नियोजित शस्त्रक्रिया पूर्ण केल्याची माहितीही आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.
Gold Silver Rate | दागिने खरेदीचा असा चान्स पुन्हा नाही
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम