नाशिक मध्ये आजपासून रिक्षा भाड्यात वाढ सुरु करण्यात आली होती. नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने खटुआ समितीच्या शिफारसीनुसार आजपासून हा निर्णय घेतला होता. आज पासून चालू होणाऱ्या नव्या दरानुसार प्रवाशांना पहिल्या दीड किलोमीटरसाठी २७ रूपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपये मोजावे लागणार होते. आजपासून रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांनाही हे नवे भाडे स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी नाशिकमधील सर्व रिक्षा चालकांना मीटर दुरुस्ती साठी ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
नाशिकशहरात 12 हजाराहून अधिक रिक्षा आहेत.शहरात रिक्षाचे मीटर दुरुस्त करणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे.अनेक रिक्षाचे मीटर अजूनही दुरुस्त झालेले नाहीत. सर्व रिक्षांचे मीटर १ डिसेंबर पर्यंत दुरुस्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे मीटर नुसार भाडे आकारण्याचे या मोहिमेला पुढे ढकलण्यात आले आहे. हा निर्णय पुन्हा फेब्रुवारी मध्ये अमलात येणार आहे. तो पर्यंत रिक्षा चालकांना मीटर दुरुस्ती साठी वेळ देण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम