TET Scam : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष शैलजा दराडे यांना अखेर अटक

0
27

TET Scam : शिक्षक भरती घोटाळ्यातील चौकशी दरम्यान दोषी आढळल्याने काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष शैलजा दराडे यांना अखेर अटक करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यात पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावून देण्याच आमिष देत प्रत्येकी 12 आणि 15 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप शैलजा दराडे यांच्यावर करण्यात आला आहे.(TET Scam)

https://thepointnow.in/rashtrawadi-crisis/

दराडे यांनी हे पैसे दादासाहेब दराडे या त्यांच्या भावामार्फत पुण्यातील हडपसर भागामध्ये घेतले होते. असा आरोप तक्रारदार पोपट सूर्यवंशी यांनी केला होता. मात्र पैसे देऊन देखील नोकरी न लागल्याने सूर्यवंशी यांनी आपली रक्कम परत मागितली यावेळी शैलेजा दराडे यांनी त्यास नकार दिल्याने सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाकडून करण्यात आले होते.(TET Scam)

या प्रकरणातील तक्रारदार सूर्यवंशी आणि शैलाच्या दराडे यांच्यामध्ये 2019 मध्ये मोबाईलवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ज्यामध्ये शैलजा दराडे फक्त शिक्षण विभागात नाही तर आरटीओ मध्ये देखील नोकरी लावून देऊ शकते असं सांगत असताना आढळून आल्या होत्या. मात्र यासाठी त्यांनी 50 लाख रुपये मोजावे लागतील असं देखील ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलं होतं.

या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर हडपसर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी शैलजा दराडेंवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.(TET Scam)

दराडे यांच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना देखील टीईटी घोटाळा अटक करण्यात आल्यानंतर त्यांचा पदभार हा शैलजा दराडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र भ्रष्ट अधिकाऱ्याच्या जागी दुसरा भ्रष्ट अधिकारीच मिळाल्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.(TET Scam)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here