Indorikar maharaj : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभजन परायण इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाने झटका देत त्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून यामुळे आता इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
*काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज*
एका कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांनी समाधी तिला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते. आणि अश्या वेळी स्त्रीसंग झाला तर आपत्य रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळणारी होतात. टायमिंग हुकला की क्वालिटी खराब असे सांगत पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीसोबत सूर्यास्ताला संग केल्यामुळे रावण, बिभीशन, कुंभकर्ण जन्माला आले तर अदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केल्यामुळे त्यांच्या पोटी हिरण्यकश्यप नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकश्यपू ने नारायण म्हणून संग केला व भक्त प्रल्हाद जन्माला आला असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात केलं होतं आणि याची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली होती.(Indorikar maharaj)
https://thepointnow.in/tet-scam/
*नेमकं काय आहे प्रकरण*
इंदुरीकर यांचे वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील आक्षेप घेत इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. याबाबत न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.
पीसीपीएनडीटी (PCPNDT) सल्लागार समितीने या प्रकरणी इंदुरीकर महाराज यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश देखील दिले होते. आणि या दरम्यान त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालय 156 (3) मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचीके नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. मात्र गुन्हा दाखल करण्याच्या या आदेशाला सत्र न्यायालयाने नकार देत हा आदेश रद्द केला होता.(Indorikar maharaj)
दरम्यान या निर्णयाच्या विरोधामध्ये एडवोकेट रंजना गवांदे यांनी एडवोकेट जितेंद्र पाटील आणि एडवोकेट नेहा कांबळे यांना औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलं होतं. याच याचिकेवर सुनामी करत असताना खंडपीठाने प्रथमवर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. मात्र आता औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला देखील इंदुरीकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर यांची याचिका निकाली काढली आहे.(Indorikar maharaj)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम