Skip to content

केदा आहेरांच्या वाढदिवसानिमित्त उद्या नियोजन बैठक


देवळा: भाजपाचे जिल्हा नेते केदा नाना आहेर यांचा रविवारी दि २७ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. केदा आहेर यांनी सरपंच ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष , जिल्हा परिषद सभापती ,बाजार समिती सभापती ,मजूर फेडरेशन अध्यक्ष तसेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष आदी विविध पदे भूषविले आहेत .या माध्यमातून राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात आहेरांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून, अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले आहे.

अल्प काळात जिल्ह्यात भाजपची ताकद वाढून ग्रामपंचायत , जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,नगरपंचायत आदी निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडून आणून भाजपचा झेंडा फडकविला . या त्यांच्या कामगिरीची जिल्ह्यासह राज्यात पसरली असून ,माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या पक्ष वाढीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे .

या माध्यमातून केदा आहेर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा हा जनसामान्यांचा मानस आहे, सदर अभिष्टचिंतन सोहळ्याची रुपरेषा ठरविण्यासाठी उद्या बुधवार दि ९ रोजी दपारी १ वाजता.बाजार समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी हितचिंतकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण भाजुमोचे तालुका अध्यक्ष योगेश नानू आहेर यांनी केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!