Train Accident |भीषण अपघात..! मालगाडी वर पूलावरून कोसळली कार

0
18

Train Accident | राज्यात आज एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या ह्या रेल्वे अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई – पुणे चौपदरी मार्गावरून जाणारी एक गाडी पुलावरुन अचानक खाली पडली व पुलाखालून जाणाऱ्या एका मालगाडीवर आदळली.

पनवेल पोलिसांनी या अपघाताची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास ही गाडी मुंबई-पनवेल चौपदरी मार्गावरून नेरळकडे जात असताना हा अपघात घडला आहे. धर्मानंद गायकवाड (४१) त्यांचे चुलत भाऊ मंगेश जाधव (४६) व नितीन जाधव (४८) अशी अपघातातील मृतांची नावं आहेत.

पहाटे साडेतीन वाजता घटना घडली

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी कर्जत व पनवेल रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या पुलावरून एक कार ही पुलाखालून जाणाऱ्या मालगाडीवर पडली. दरम्यान, या अपघातात तीन जण ठार झालेत तर, दोन जण जखमी झाले आहेत. पनवेल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की, पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान ही कार मुंबई-पनवेल महामार्गावर नेरळकडे जाताना हा अपघात झाला आहे.

Nashik News | देवळा पाणीपुरवठा योजनेचे ७ कर्मचारी आस्थापनेवर

मंत्री रामदास आठवलेंकडून दुःख व्यक्त 

पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मयत धर्मानंद गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कार्यकर्ते होते. आरपीआयचे प्रमुख व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याबद्दल शोक व्यक्त करत या तातडीने या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मालगाडीचे डब्बे झाले वेगळे

या अपघाताबद्दल मध्य रेल्वेचे (सीआर) जनसंपर्क संचालक डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितलं आहे की, ही मालगाडी पनवेलहून रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या दिशेने चालली होती आणि ह्या आपघातामुळे तिचे काही डब्बे वेगळे झाले. दरम्यान, अपघातामुळे सीआर हायवेचा पनवेल-कर्जत रस्ता हा पहाटे ३ ते सकाळी ७.३२ वाजेपर्यंत बंद होता.

Nashik Citylinc | नाशिकची जीवनवाहिनी पुन्हा बंद..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here