Skip to content

पुन्हा जुन्या रंगात अवतरली टीम इंडिया ! पाहिलेत का नव्या जर्सीचे फोटो ?

cricket

मुंबई – बीसीसीआयने आगामी टी२० विश्वचषकासाठी आज टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. ह्या नव्या जर्सीचा रुपाने टीम इंडिया आपल्या जुन्या व ऐतिहासिक अश्या रंगात पुन्हा अवतरला आहे.

टीम इंडियाची किट बनवणारी कंपनी एमपीएल स्पोर्ट्सने ही जर्सी बनवली असून ह्या जर्सीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत असून ट्वीटरवर #HarFanKiJersey असा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंगला आहे.

आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाची नवी जर्सी आज लाँच झाली आहे. संघाची ही नवीन जर्सी फिकट निळ्या रंगाची असून त्यावर आकर्षक डिझाईन केलेले आहे. त्यामुळे ह्या जर्सीचे नाव ‘वन ब्लू’ असे आहे. नव्या जर्सीत रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव व महिला संघातील कर्णधार हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा व रेणुका ठाकूर दिसत आहे.

टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला  जाणार आहे. पण त्याआधी भारतीय संघ पुढील आठवड्यापासून मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!