राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत टाकेद बु येथे टाकेद आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ भारती फुले यांच्या संकल्पनेतून, टाकेद ग्रामपंचायतच्या प्रयत्नांतून व आरोग्य वर्धिनी केंद्र खेड, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र टाकेद यांच्या विद्यमाने आहार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक बारा वाजता या शिबिराला प्रारंभ करण्यात आला.
देवी सरस्वती मातेचे महापुरुषांचे पूजन करून टाकेद ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या शिबिराला टाकेद ग्रामपंचायत हद्दीतील बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडी सह टाकेद परिसरातून बहुसंख्य महिलांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा कर्मचारी यांच्या गाव परिसरातील सर्वच महीला बचत गटांच्या महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे होत्या.
दैनंदिन जीवनात प्रत्येकाने नित्यनियमाने वेळेत चांगला सकस आहार घेतला पाहिजे, सेंद्रिय पदार्थांचा नियमित वेळेत माणसाने वापर केला पाहिजे, योग्य वेळी झोप,योग्य आहार आणि योग्य व्यायाम या त्रिसूत्रीने वेळापत्रकानुसार माणसांचे आरोग्य टिकून राहील अन्यथा आज अनेक मोठं मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते आहे. यासोबतच कर्बोदके, कॅल्शिअम, खनिजे, तेल, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, संतुलित व चौरंग आहार (व्हिटामिन, मीनरल्स, फॅट, ऑइल, कॅल्शिअम), आदी पोषक तत्वे-जीवनसत्व आणि संतुलित व पोषक आहार या संदर्भात कोणते पदार्थ, पाले भाज्या, दूध, फळे, मांसाहार , अंडी, चिकन ,कडधान्य, केक, बिस्कीट, मैदा पदार्थ खाल्याने आपल्याला काय मिळते व काय खाल्याने आपल्याला आजाराला सामोरे जावे लागते ,चहा प्यायल्याने काय होते, दूध व चहा याचे उत्तम उदाहरणांसह मार्गदर्शन आहार तज्ञा डॉ इंद्रायणी पवार यांनी यावेळी बोलतांना दिले.
या कार्यक्रमात खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ भोईर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ भारती फुले,अंगणवाडी सेविका मंगल, डोळस, उपसरपंच रामचंद्र परदेशी,पर्यवेक्षिका पूर्वा दातरंगे आदींनी आपापले मनोगत यावेळी बोलतांना व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक वक्त्या डॉ इंद्रायणी पवार होत्या तर अध्यक्षस्थानी सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी,आदर्श शेतकरी जगन्नाथ घोडे, खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ भोईर,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ भारती फुले,आरोग्य सेविका भारती सोनवणे,सुजाता सरोडे, एम पी डब्लू सुनिल तळपे,अमोल पाटील,ग्रामविकास अधिकारी कुलकर्णी भाऊसाहेब,टाकेद अंगणवाडी बीटाच्या पर्यवेक्षिका पूर्वा दातरंगे,आशा कर्मचारी विजया बांबळे, सुनीता धादवड, सीता नांगरे, ग्रामपंचायत सदस्या लता लहामटे, नंदाबाई शिंदे,भीमाबाई धादवड आदींसह परिसरातील सर्व अंगणवाडी सेविका,सर्व महिला बचत गटांतील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी व कार्यक्रमाची पूर्वतयारी ग्रामपंचायत कर्मचारी लालमन नांगरे,किशोर पवार,सागर दवंडे,ज्ञानेश्वर पवार आदींनी मेहनत घेतली, तर जनता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट टाकेद चे वसंत नाठे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी केले. एस एम बी टी महाविद्यालयातील एम बी बी एस च्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्ष्यवेधी ठरली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम