टाकेद येथे मनसेची आढावा बैठक संपन्न

0
19

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी च्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक रविवार ०४ दुपारच्या दरम्यान नुकतीच संपन्न झाली. या आढावा बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी आढावा घेतला.

मनसे पक्षाची मराठी माणसासाठी एकनिष्ठता बघता व पक्षाची बांधणी बघता येणाऱ्या काळात निष्ठावान कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा आणि वाडी वस्ती तिथे कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.आज पक्षीय बलाबल वाढलं गेलं पाहिजे. हे कार्यकर्त्यांच्या कामातून सिद्ध झालं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने निष्ठेने पक्ष वाढीसाठी काम करावे. येणारी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही मनसे पक्ष्याची अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे गाव तिथे मनसे कार्यकर्त्यांची मोठी मजबूत फळी तयार होणे गरजेचे आहे. सर्वांनी जोमाने काम करावं असे मार्गदर्शन मनसे प्रदेशाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी या आढावा बैठकीत मनसे कार्यकर्त्यांना केले.

या बैठकीत प्रत्येक मनसे सैनिकांनी पक्ष वाढीसाठी येणारे अडथळे, स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रश्न, स्थानिक परिसरातील सुख सुविधा विषयी असणारे प्रलंबित प्रश्न यासंदर्भात जेष्ठ पदाधिकारी वर्गाकडे मनातील भावना व्यथा मांडल्या यावर वरिष्ठ पदाधिकारी वर्गाने सकारात्मक चर्चा करत स्थानिक नवीन कार्यकर्त्यांना मोठा आधार दिला.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, जेष्ठ नेते डॉ युनूस रंगरेज, जिल्हा संघटक मनोज गोवर्धने, निकितेश धाकराव, जावेद शेख, विजय आगळे, जनार्धन खाडे, मनसे विद्यार्थी सेना उप जिल्हाध्यक्ष आत्माराम मते, इगतपुरी तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, तालुका संघटक अंबादास पाबळकर, शत्रुघ्न भागडे, संतोष बिन्नर, त्र्यंबक दूरगुडे, गट प्रमुख विजय कोरडे,विठ्ठल वारुंगसे, विजय गाढवे, जालिंदर करवंदे, राजेश गाढवे, अशोक गाढवे, सागर गाढवे, मंगेश गाढवे, नितीन गोडे, रोहित कदम, अमित जाखेरे आदींसह बहुसंख्य मनसे कार्यकर्ते यावेळी उपास्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here