राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद: इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील अडसरे येथील सर्वतीर्थ माध्यमिक विद्यालयात टाकेद बिट स्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये कला प्रकारात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, क्रीडा मध्ये खो खो, कबड्डी, ४००मीटर धावणे, सांस्कृतिक प्रकारात ,वयक्तिक नृत्य, वयक्तिक गीत गायन, समूह नृत्य, समूह गीत गायन, बौद्धिक खेळ अश्या अश्या प्रकारांत लहान व मोठ्या गटांमध्ये मुली आणि मुलांमध्ये या स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये टाकेद-खेड केंद्रातील जवळपास पंचवीस शाळांनी सहभाग नोंदविला होता.
सर्वतीर्थ माध्यमिक विद्यालय अडसरे बु याठिकाणी मुख्याध्यापक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तर अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी पाटील, बिट विस्तार अधिकारी राजेंद्र तायडे, इंदोरे केंद्रप्रमुख सोनवणे, टाकेद केंद्रप्रमुख कैलास भवारी, खेडचे केंद्रप्रमुख ठोकळ आदींसह अडसरे सरपंच सतू साबळे, काशिनाथ साबळे, परिसरातील ग्रामस्थ, बिटातील सर्वच शिक्षक, शिक्षिका तसेच परीक्षण करणारे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद आदींच्या उपस्थितीत ही स्पर्धा मोठ्या खेळीमेळीत आनंददायी विद्यार्थ्यांच्या उत्साहदायी वातावरणात जल्लोषात पार पडली.
या टाकेद बिट स्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये खेड केंद्रातील अधरवड व परदेशवाडी शाळेने शान राखत यश मिळविले यामध्ये जिल्हा परिषद अधरवड शाळेने चित्रकला स्पर्धेत- धनश्री गणपत डमाळे प्रथम, कबड्डी स्पर्धा मोठा गट मुली अधरवड शाळा प्रथम क्रमांक, वैयक्तिक गीत गायनात प्रथम आदित्य विठ्ठल वाघमारे, समूह नृत्य मोठा गट मुली व समूह गीत गायन मुली यात अधरवड शाळा प्रथम समूह नृत्य छोटा गट- जि प प्रा शाळा परदेशवाडी, स्पेलिंग बी -श्रद्धा ज्ञानेश्वर ब-हे प्रथम आदींची तालुकास्तरावर निवड झाली असून त्यांना यश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक नंदकुमार भोजने, आर बी गांगुर्डे, एस भांगरे, मुख्याध्यापक आर झे बोरसे, वाय एन कुलट, व्ही आर कापडणे, एम एस आलई, पी एस चांगटे, जे एल खादे आदी शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अंतिम निकालपत्र मोठा गट एकुन बक्षिसे ३०
वक्तृत्व स्पर्धा– प्रथम स्नेहल सुनील लहामगे(बारशिगवे) द्वितीय श्रद्धा ज्ञानेश्वर ब-हे (अधरवड, चित्रकला स्पर्धा- प्रथम धनश्री गणपत डमाळे(अधरवड), द्वीतिय तनुजा पंढरीनाथ खतेले(इंदोरे), क्रीडा प्रकार २००मीटर धावणे मुली, स्पर्धा- प्रथम-रोहिणी निवृत्ती घाणे(बारशिगवे), द्वीतिय-वैष्णवी जयराम जाधव (अधरवड), ४०० मीटर धावणे मुले स्पर्धा- प्रथम- स्वागत रामकीसन भोईर (बारशिगवे), द्वीतिय-दीपक छगन परदेशी(अधरवड), खो-खो मुले-बारशिगवे संघ, खो-खो मुली-बार शिगवे, कबड्डी मुले- बारशिगवे,कबड्डी मुली-अधरवड ,सांस्कृतिक प्रकारात वैयक्तिक नृत्य : प्रथम – रिक्षा ज्ञानेश्वर सोनवने(इंदोरे), द्वितीय- श्रुती नामदेव राक्षे(अधरवड), वैयक्तिक गीत गायन– प्रथम-आदित्य विठ्ठल वाघमारे, द्वितीय-सपना तुळशीराम भोईर(बारशिगवे), समूह नृत्य- प्रथम-अधरवड, द्वितीय- बारशिगवे, समूह गीतगायन– प्रथम- अधरवड,द्वितीय- बारशिगवे
बौद्धिक खेळ – प्रथम – श्रुती पोपट लहामंगे (इंदोरे), द्वितीय- रोहन महेश परदेशी(खेड अधरवड).
अंतिम निकालपत्र लहान गट एकूण बक्षिसे २२
वक्तृत्व स्पर्धा– प्रथम साक्षी अशोक बगड, (ठोकळवाडी),
द्वितीय सोहम काळू मोरे, (इंदोरे), चित्रकला स्पर्धा : प्रथम- माया नरेश मोहानपरिया (टाकेद) ,द्वीतिय- विशाल पप्पूराज आगीवले, (परदेशवाडी), क्रीडा प्रकार १०० मीटर धावणे मुली, स्पर्धा- प्रथम-पूर्वा शरद लगड (टाकेद), द्वीतिय-वर्षा भाऊराव खडके(बारशिगवे) तृतीय : स्वरा विलास पगारे(अधरवड), २०० मीटर धावणे मुले स्पर्धा– प्रथम-अमर साहेबराव भले(बारशिगवे),द्वीतिय-वृषभ जयराम जाधव (अधरवड), तृतीय : रोहित भाऊराव हिलम(टाकेद), सांस्कृतिक प्रकारात वैयक्तिक नृत्य : प्रथम – जीविका अशोक घोडे(बांबळेवाडी), द्वितीय-छकुली रामनाथ भले(राहुलनगर), तृतीय : ऋतुजा विजय कचरे (काननवाडी)वैयक्तिक गीतगायन- प्रथम- संखेत गणेश बांबळे(टाकेद), द्वितीय-पायल विठ्ठल रोंगटे(बारशिगवे), तृतीय : सिद्धी धनराज ब-हे(अधरवड), समूह नृत्य– प्रथम-परदेशवाडी, द्वितीय- टाकेद, समूह गीतगायन- प्रथम- अडसरे बु,द्वितीय- अधरवड बौद्धिक खेळ – प्रथम – कार्तिक संभव पांडे (टाकेद), द्वितीय- मयूर मारुती धादवड,इंदोरे).
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम