राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील एकमेव मुख्य बाजारपेठ असलेल्या तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद येथे ७६ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यासोबतच ७५ व्या अमृत महोत्सवी गाव परिसरातील सर्व ग्रामस्थांनी हर घर तिरंगा हे अभियान काटेकोरपणे राबवत मोठ्या आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा केला.

दरम्यान शासकीय नियमांचे पालन करत टाकेद ग्रामपंचायत कार्यालय,जि प प्राथमिक शाळा,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,महर्षी वाल्मिकी आश्रम शाळा टाकेद, पोस्ट कार्यालय,जि प शाळा बांबळेवाडी,घोडेवाडी, शिरेवाडी याठिकाणी १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासन आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित शेतकरी जगन्नाथ घोडे यांच्या मुलीच्या हस्ते व शालेय विद्यार्थीनिंच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला तर १४ ऑगस्ट रोजी गावातील पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी एस खामकर,पी धादवड यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला तर १५ ऑगस्ट दरम्यान लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच ताराबाई बांबळे,उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई शिंदे,जेष्ठ नागरिक आबाजी बारे यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले.

सकाळी ०७ वाजेला सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ढोल ताश्यांच्या गजरात प्रभात फेरी- रॅली काढत भारत माता की जय,भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा घोषणा देत संपूर्ण गाव परिसर दुमदुमून तीरंगामय झाला.
यावेळी गाव परिसरसतील शेकडो विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, कृषी सहाय्यक, वायरमन, पोष्टमन, पोलीस पाटील, तलाठी सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्गासह शेतकरी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम