Skip to content

स्विगीनं घेतला मोठा निर्णय, अनेक शहरांमध्ये डेलिव्हरी सर्व्हिस बंद


ऑनलाईन फूड डिलिव्हरी स्विगीनं कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी अद्याप या सर्व्हिसमधून नफा मिळवू शकलेली नाही. स्विगीनं देशभरातील पाच प्रमुख शहरांमधील सुपर डेलिव्हरी सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्विगीच्या सुपर डेली सर्व्हिस मध्ये दूध, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामानाची डिलिव्हरी मिळते. डेली सर्व्हिस ही सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. म्हणजेच ग्राहकांना ही सर्व्हिस मिळवण्यासाठी अगोदर सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. स्विगीला तोटा होत असल्यामुळे सुपर डेलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

या शहरांत मुंबई-पुण्यासह स्विगीची सुपर डेली सर्व्हिस दिल्ली-एनसीआर , मुंबई , चेन्नई , पुणे आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांत बंद करण्यात आली आहे. 12 मे 2022 पासून या शहरांमध्ये सुपर डेली सर्व्हिस मिळणार नाही.ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

कंपनीनं 10 मे पासून नवीन ऑर्डर्स घेणं बंद केलं आहे. सर्व्हिस बंद झाल्यानंतर पाच ते सात बिझनेस डेजमध्ये कस्टमर्सच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

 

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!