राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत टाकेद बु हद्दीतील घोडेवाडीत स्वदेश फाउंडेशन व सर्वतीर्थ ग्रामपंचायत टाकेद बुद्रुक यांच्या सहकार्याने घोडेवाडीत शौचालय व पाणी नळ लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.
गेल्या दोन वर्षांपासून घोडेवाडी गावात स्वदेश फाउंडेशन काम करत होते यामध्ये घोडेवाडीतील शंभर कुटुंबाना शौचालय बांधकाम पूर्ण करून दिले, त्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांचे मोती बिंदू चे शस्रक्रिया मोफत करून देण्यात आली त्यानंतर गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गवंडी मिस्तरी कामाचे साहित्याचे वाटप करत मोफत प्रशिक्षण देण्यात आले.यासोबतच घोडेवाडी गावात स्वच्छता उपक्रम स्वदेश फाउंडेशन कडून घेण्यात आले. या त्यांच्या केलेल्या कार्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनआदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ घोडे यांच्या नेतृत्वाखाली घोडेवाडी गाव विकास समिती कडून व ग्रामपंचायत टाकेद बु यांच्या सौजन्याने भव्य लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत.
आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे फुलांची उधळण करत औक्षण करून समस्त ग्रामस्थांनी स्वागत केले. यानंतर सर्व ग्रामस्थांनी स्वच्छ गाव सुंदर गाव,आपला गाव आपला विकास, एकच ध्यास गावचा विकास अश्या घोषणा देत रॅली काढली त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नवीन शौचालय व पाईपलाईन नळ कनेक्शनचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी अध्यक्ष सरपंच सौ ताराबाई रतन बांबळे तर उद्घाटक माजी आमदार शिवरामजी झोले होते.
यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांसह स्वदेस फाउंडेशनच्या पदाधिकारी वर्गाचा ग्रामपंचायतच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वदेश फाउंडेशनचे खंडागळे ,उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी केले. मान्यवरांमधून माजी आमदार शिवराम झोले, बाळासाहेब गाढवे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती पाटील जाधव, खंडेराव झनकर, हरिदास लोहकरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वदेस फाउंडेशन चे पदाधिकारी अधिकारी यांनी बोलतांना गावकऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिवराम झोले, निवृत्ती पाटील जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, हरिदास लोहकरे, सुनिल भाऊ जाधव, खंडेराव झनकर, पोलीस पाटील मारुती बांबळे, यशवंतराव धादवड, आदर्श शेतकरी जगण घोडे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, ग्रामपंचायत सदस्या लता लहामटे, युवती तालुकाध्यक्ष रुख्मिनी जोशी, सुशीला भवारी, रोहिणी नांगरे, विक्रम भांगे, केशव बांबळे, जेष्ठ नागरिक आबाजी बारे, उद्योजक नंदू जाधव, रुख्मिनी जोशी, जगन घोडे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी ग्रामस्थ महिला बचत गटातील महिला शेतकरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम