सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : नाशिक | खासदार हेमंत गोडसे यांनी सुतार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट देत येथील उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांना पाठींबा दर्शविला. सोबतच शासनस्तरावर याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.(Sutar Reservation)
दरम्यान, दुपारी ४ वाजता समाज बांधवांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी ह्या उपोषणाची दखल घेत प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच मंत्रालयात सुतार समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे सांगत निवेदन स्वीकारले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून उपोषण स्थळी तात्काळ भेट देण्याचे सांगून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील दिले.(Sutar Reservation)
पालकमंत्री दादा भुसे यांनी सुतार समाजाच्या मागण्यांना सकारात्मकता दाखविल्याने समाज बंधवांनी यावेळी समाधान व्यक्त केले. ‘अखिल महाराष्ट्र सुतार लोहार’ संघाचे प्रदेशाध्यक्ष सुदाम खैरनार यांनी (दि. १९) पासून नाशिक येथे प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे असून, याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
Malegaon News | …. यामुळे पालकमंत्र्यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी
दरम्यान, यात मागण्यांमध्ये सुतार समाजाचा भटक्या जमातींमध्ये समावेश केला जावा आणि लोक संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. लोहार समाजाला भटक्या जमातीत आरक्षण दिले असून, सुतार समाजाला यातून वगळण्यात आले आहे. सुतार आणि लोहार हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. दोन्ही समाजाचे विश्वकर्मा भगवान हेच दैवत आहे. तसेच विश्वकर्मा विकास महामंडळाचीही अनेक वर्षापासूनची प्रलंबीत मागणी आहे.(Sutar Reservation)
आताच्या काळात नोकऱ्यांचे प्रमाण हे अत्यंत कमी झाले असून, असे असतांना सुतार समाज हा स्वकष्टाने व कौशल्याने रोजगार निर्माण करु शकतो. त्यामुळे स्वतंत्र ‘विश्वकर्मा समाज विकास महामंडळ’ हे निर्माण केले तर, समाजातील अनेक तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास याची मदत होईल. यासाठी राज्य शासनाने विश्वकर्मा विकास महामंडळाची लवकरात लवकर स्थापना करावी. ओबीसी विकास महामंडळात खऱ्या मागासवर्गीयांना डावलले जात असून याचा धनदांडगे लोकच फायदा करुन घेतात त्यामुळे शासनाने स्वतंत्र विश्वकर्मा विकास महामंडळाची निर्मिती करावी. (Sutar Reservation)
Entertainment News | जिराफ थिएटर्सच्या ‘गुडबाय किस’ चा नाशकात रंगणार प्रयोग
राज्यात प्रत्येक जिल्ह्यास्तरावर सुतार व लोहार समाजाच्या विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मीती करावी. हा समाज हातावरचा असल्याने आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने हे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. याची राज्य सरकारने दखल घ्यावी, ह्या प्रमुख मागण्यांसाठी सुतार समाजातर्फे हे आंदोलन केले जात आहे.(Sutar Reservation)
ह्या मागण्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदने देऊनही या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुतार समाजाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुदाम खैरनार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांची नाना खैरनार, युवराज खैरनार, दत्ता खैरनार, रमेश जाधव, गोरख वाकचौरे, गणेश सोमवंशी, जयप्रकाश कुवर आदी समाज बांधवांनी भेट घेतली. (Sutar Reservation)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम