Crime news | डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी करायची सर्जरी

0
27

Crime news | उघडकीस आलेल्या ह्या सर्जरी स्कॅममध्ये आरोपी डॉ. नीरज अग्रवाल हा त्याच्या रिसेप्शनिस्ट पत्नीकडून ऑपरेशन करून घेत असल्याचे समोर आले आहे. तिच्याकडे कुठलीही मेडिकल डिग्री नव्हती. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 दिल्ली पोलिसांनी ग्रेटर कैलास येथून दोन डॉक्टर व दोन बनावट डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या दवाखान्यात कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळ सुरू होता. या दवाखान्यात शस्त्रक्रियेनंतर ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.

राजधानी दिल्लीच्या पॉश परिसरात असलेल्या ग्रेटर कैलाशमधील अग्रवाल मेडिकल सेंटरमध्ये हा सर्व घोटाळा झाल्याचे उघडकीस आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चार डॉक्टरांना अटक केली आहे.

Nashik news | नाशिकचे प्रसिद्ध सराफ दंडे यांच्या फ्रॉड स्कीम उघड..?

डॉ. नीरज अग्रवाल, पत्नी पूजा अग्रवाल, डॉ. जसप्रीत व ओटी तंत्रज्ञ महेंद्र अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. नीरज व जसप्रीत हे स्वतः एमबीबीएस डॉक्टर आहे. पण, पूजा व महेंद्र हे बनावट डॉक्टर असल्याचे दाखवून रुग्णांवर  शस्त्रक्रिया करित होते.

डॉ. नीरज हे त्यांच्या पत्नीकडून ऑपरेशनसाठी मदत घ्यायचे. पण, तिच्याकडे कुठलीही मेडिकल डिग्री नव्हती. तर दूसरा आरोपी महेंद्र हा याच नर्सिंग होममध्ये गॉल ब्लॅडरची समस्या असलेल्या रुग्णांचे ऑपरेशन करत होता.

Crime News | अल्पवयीन मुलावर मशिदीच्या करमचाऱ्याने केला लैंगिक अत्याचार

आतापर्यंत अनेकांनी गमावला जीव

या बनावट डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. एका ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर, हे प्रकरण संशयास्पद असल्याचे डॉक्टरांना वाटले.

कारण  २०२२ सालीही याच क्लिनिकमध्ये एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. प्रसूती वेदनांमुळे तिला या रुग्णालयात दाखल केले होते. पण, डॉक्टरांनी प्रसूती न करताच शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला होता.

सफदरजंग रुग्णालयातही केले काम

माहितीनुसार, अग्रवाल मेडिकल सेंटर हे डॉ. नीरज अग्रवाल यांचे आहे. यापूर्वी नीरजने सफदरजंग रुग्णालयात काम केले. त्यानंतर त्यांनी हे नर्सिंग होम उघडले. ज्यामध्ये त्याची पत्नी पूजा अग्रवाल ही रिसेप्शनिस्ट व नर्सिंग स्टाफ म्हणून काम करत होती आणि महेंद्रने या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन टेक्निशियन म्हणून काम केले. या रुग्णालयात सर्जन असलेल्या डॉ. जसप्रीत यांचे त्यांनी लेटरहेडही ठेवले होते.

त्या नर्सिंग होममध्ये कोणताही रुग्ण आला की त्याला थेट ऑपरेशन करावयास सांगितले जायचे. डॉ. जसप्रीत यांच्या नावाने प्रिस्क्रिप्शन तयार केले जायचे तर, तंत्रज्ञ महेंद्र हा ऑपरेशन करायचा. या चौघांच्या फसवेगिरीमुळे ऑपरेशननंतर अनेकांनी त्यांचा जीव गमावला आहे. पोलिसांनी याप्रकरणी, चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

sbi recruitment | SBI मध्ये ८,२८३ पदांसाठी बंपर भरती


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here