Infotech news | सनरूफ कार घ्यायचीय? अगदी कमी बजेटमध्ये खरेदी करा ह्या सनरूफ कार

0
33

Infotech news |  तुम्हालाही नवीन सनरूफ असलेली कार घायायचीय तिही तुमच्या बजेटमध्ये तर, बाजारात टाटा ते ह्युंदाई पर्यंतच्या अनेक कार उपलब्ध आहेत. आणि ह्या कंपनीजच्या कारच्या किंमती देखील अगदी बजेट फ्रेंडली असून, ह्या कारमध्ये जबरदस्त फीचर्सदेखील देण्यात आलेले आहेत.

ह्युंदाई मोटर्स ह्या कंपनीकडून त्यांची स्वस्त व शानदार मायक्रो एसयूव्ही Exter ही अलीकडेच भारतात दाखल करण्यात आलेली आहे. ह्या कारला ग्राहकांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे. ह्या एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत ६ लाख रुपये असून, टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही १०.१५ लाख रुपये इतकी आहे. ह्या कारमध्ये ग्राहकांना सनरूफ सारखे फीचर्सदेखील दिले जाणार आहे. (Infotech news)

टाटा पंच

टाटा मोटर्सनेही त्यांची सर्वात लहान एसयूव्ही पंच ही लॉंच केलेली आहे. ह्या कारमध्ये पेट्रोल तसेच सीएनजीचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. लवकरच ह्या कारमध्ये इलेक्ट्रिक पर्याय देखील मिळण्याची शक्यता आहे.

पंच ह्या कारमध्ये ग्राहकांना सनरूफ सारखे फीचर्स तेही अगदी कमी बजेटमध्ये दिले जाणार आहे. ह्या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही ६ लाख रुपये आहे. तर, टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही १०.१० लाख रुपयांपर्यंत जाते. ह्या कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये ५ स्टार सुरक्षा रेटींग मिळालेले आहे. (Infotech news)

Virat Kohli | आता T-20 आणि वनडे खेळणार नाही; वर्ल्डकपनंतर विराटचा मोठा निर्णय

टाटा Altroz

टाटा मोटर्स ह्या कंपनीने त्यांच्या प्रीमियम हॅचबॅक कार Altroz मध्येदेखील सनरूफ फीचर्स दिलेले आहे. ह्या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही ६ लाख रुपये आहे. तर, टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही १०.७४ लाख रुपये इतकी आहे. (Infotech news)

ह्युंदाई i20

ह्युंदाई मोटर्स ह्या कंपनीकडून त्यांच्या नवीन i20 हॅचबॅक ह्या कारमध्ये सनरूफ सारखे जबरदस्त फीचर्स देखील दिले आहेत. तुम्हीही ही कार अगदी कमी बजेटमध्ये खरेदी करू शकणार आहात. ह्या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही ६.९९ लाख रुपये अशी आहे. तर, टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही ११.१६ लाख रुपये अशी आहे.

Mahindra XUV300

महिंद्रा ह्या कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या स्वस्त तसेच मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या अशा XUV300 एसयूव्ही ह्या कारमध्ये देखील सनरूफ हे फीचर्स दिलेले आहेत. ह्या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही ७.९९ लाख रुपये इतकी आहे. तर, टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ही १४.७६ लाख रुपये अशी आहे. (Infotech news)

Crime News | सजून धजून नवरी वरातीची वाट बघत होती; पण नवरा आत्तेबहिणीसोबत फरार


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here