Sunetra Pawar Rajya Sabha : लोकसभेतील दारुण पराभवानंतर अजित पवर्णणी आता राज्यसभेकडे मोर्चा वळवला असून, राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. तसेच त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) नणंद विरुद्ध भावजय या लढतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बाजी मारली आणि सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांचा दारुण पराभव झाला. दरम्यान, पराभवानंतर अजित पवार मागच्या दाराने पत्नीला संसदेत पाठवणार आहेत. काल अजित पवारांच्या निवासस्थानी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांचे फायनल करण्यात आले. मात्र, यामुळे अजित पवारांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घेतली. तर, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि इतरही बडी नेते मंडळी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
Sunetra Pawar Rajya Sabha | दादांचं ठरलंय..! पत्नीला खासदार बनवणारच; घेतला ‘हा’ मोठा निर्णय..?
Sunetra Pawar Rajya Sabha | पक्षातील एक गट नाराज
आज शेवटचा दिवस असल्याने सुनेत्रा पवार या दुपारी दीड वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी हेदेखील इच्छुक होते. मात्र, सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने आणि पक्षाचे निर्णय हे केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच घेत असल्याने इतरांशी सल्लामसलत केली जात नाही, अशी खदखद व्यक्त करत पक्षातील एक गट नाराज असल्याची माहीती समोर आली आहे.(Sunetra Pawar Rajya Sabha)
भुजबळांनी बोलून दाखवली नाराजी..?
काल झालेल्या बैठकीतही छगन भुजबळ यांनी “ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात आहे. याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आलेला होता. मग उगीच उमेदवारी जाहीर करण्यासाठी एवढा वेळ का घालवला..? असा सवाल छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारला.
Sunetra Pawar | बायकोला निवडून द्या, तुम्हाला माझाही फायदा; कारण बायको म्हणाली, “अहो…”
लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला ‘बॅक डोअर एन्ट्री’ का
तसेच लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवाराला ‘बॅक डोअर एन्ट्री’ का दिली जातेय..? असा सवालही यावेळी छगन भुजबळ यांनी केला आहे. बुधवारी रात्री उशीरा अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाराजी नाट्य रंगले आणि तरीही नाराजी पत्करून अजित पवारांनी पत्नीलाच उमेदवारी दिल्याची माहीत समोर आली आहे. दरम्यान, अजित पवार गटात आताच नाराजीची ठिणगी पडली असून, याचे रूपांतर पुढे वणव्यात होणार का..? हे पहावे लगणार आहे. तसेच नाराज छगन भुजबळ शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा खऱ्या ठरणार का..? हेदेखील येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. (Sunetra Pawar Rajya Sabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम