Sudhakar Badgujar | बडगुजर यांच्या विरोधात नाशिक शिवसेनेतर्फे जोडे मारो

0
73
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

Sudhakar Badgujar | हिवाळी अधिवेशनादरम्यान आज भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला असून मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेल्या सलीम कुत्तासोबत उबाठा गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर नाचत असल्याचा कथित व्हिडीओ अधिवेशनात समोर आणलेला आहे. सुधाकर बडगुजर यांना नाशिक शहरात काही भयानक घडवायचे आहे का? या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराशी बंधुत्व, हेच आहे का उबाठा गटाचे हिंदुत्व? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. (Sudhakar Badgujar)

१९९३ मधील मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटामधील शिक्षा भोगणाऱ्या सलीम कुत्ता सोबत पार्टी करणाऱ्या उबाठा गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा या देशद्रोही कृत्याच्या निषेधार्थ शिवसेना नाशिकच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करून फोटोला काळं फासण्यात आले. या प्रसंगी शिवसेना नाशिक सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी, सिद्धेश अभंगे, नितीन लांडगे, मंगलाताई भास्कर, हर्षदा गायकर, योगिता ठाकरे, रुपेश पालकर, अंबादास जाधव, सदानंद नवले, दिगंबर नाडे, मंगेश करंजकर, अमोल सूर्यवंशी, रोशन शिंदे, आनंद फरताळे, अभय महादास, कैलास जाधव, मनीष खेले, उमेश चव्हाण, आदित्य बोरस्ते, संदेश लवटे, ओमकार चव्हाण, आकाश पवार, राहुल वारुळे, मिलिंद मोरे, आकाश कोकाटे, अमेय जाधव, ओंकार कंगले, नरेंद्र शेखावत, श्रावण पवार, जॉर्ज वरशाला, मयूर तेजाळे, किरण राक्षे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Nashik Breaking | नाशकात बडगुजर यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक

Sudhakar Badgujar | १९९३ मध्ये काय घडलं होतं? 

देशातील सर्वात मोठा बॉम्ब स्फोट म्हटला जाणारा बॉम्ब हल्ला १२ मार्च १९९३ ला झाला होता ज्यात मुंबईमध्ये १२ बॉम्ब ब्लास्ट करण्यात आले होते. संपुर्ण देशाला हादरवून देणारा हा दिवस ठरला ज्या हल्लात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. मुंबईत झालेल्या या हल्ल्याच्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा खास शूटर (राईट हॅण्ड) सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याला ही कटात सहभागी असल्याने न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे.

आज याच सलीम कुत्ता सोबत नाशिकचे उबाठा गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे ‘मैं हूं डॉन’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. बडगुजर यांची तातडीने चौकशी व्हावी, त्यांनी काय भेट दिले? नाशिक मध्ये काही मोठे घडवायचे नियोजन आहे का? याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी आता केली जात आहे.

Breaking | ठाकरे सेनेचा बुरखा फाटला; मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ‘कुत्ता’ सोबत बडगुजरांची पार्टी

मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यात २५७ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्यांचे, शिवसेना भवन उडवण्याचा कट रचणाऱ्यासोबत सुधाकर बडगुजर का नाचत होते? हेच यांचे बेगडी हिंदुत्व आहे का? बडगुजर यांना नाशिकचे डॉन व्हायचे आहे का? ही पार्टी कुठे झाली? नाशिककरांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना सह संपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here