Sudhakar Badgujar | नागपूर येथे सुरू विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचे १९९३ मुंबईच्या बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असून, बडगुजर यांना नाशिकमध्ये काही तरी अघटित घडवायचे आहे का..? असे आरोप करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत कारवाईची मागणी केली. आणि त्यानंतर सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता पार्टी प्रकरण हे राज्यभरात चर्चेत आले.
ह्या प्रकरणाचे नाशिकमध्ये मोठे पडसाद उमटले आणि बडगुजर यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी मूठ एकवटली. दरम्यान, यानंतर लगेचच बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची नाशिक पोलिसांकडून तब्बल ४ तास चौकशी करण्यात आली आणि यानंतर पत्रकार परिषद घेत बडगुजरांनी त्यांच्यावरील सर्व आरोप हे फेटाळले होते. दरम्यान, आता नाशिक पोलिसांकडून बडगुजर यांची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात एक मोठी माहिती हाती लागलेली आहे.
Sudhakar Badgujar | …तर मी आधिक्षकांच्या दालनातच फाशी घेईल- सुधाकर बडगुजर
बडगुजर आणि सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी एक व्हिडिओ समोर आलेला होता. या व्हिडिओचे तसेच या पार्टी बाबतची माहिती ही पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणाची तसेच सुधाकर बडगुजर यांची कसून चौकशी नाशिक पोलिसांनी सुरु केली आहे. या चौकशीतून आता त्या व्हायरल व्हिडिओमधील काही सत्यही समोर आले आहे. या प्रकरणातील ‘त्या’ व्हायरल व्हडियोमध्ये दिसणारे फार्म हाऊस हे सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांचेच असल्याचे समोर आले आहे. (Sudhakar Badgujar)
फार्म हाऊस नेमके कोणाचे..?
हे प्रकरण समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांची कसून चुकशी सुरू केली होती. या प्रकरणी, काल सहाव्यांदा बडगुजर यांची चौकाशी झाली असून, कालच्या चौकशीतून या प्रकरणातील एक महत्त्वाची माहिती नाशिक पोलिसांच्या हाती लागली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ‘ती’ पार्टी कोठे झाली होती? याबाबत चौकशी केली असता, ही पार्टी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याच एका नातेवाईकांच्या फार्म हाऊस वर झालेली असल्याचे ह्या कालच्या चुकशीतून निष्पन्न झाले आहे.
Sudhakar Badgujar | सुधाभाऊंचा करेक्ट कार्यक्रम राजकीय सुडापोटी की कर्माने ?; वाचा सविस्तर
नाशिक शहरामधील आडगाव परिसरातील हिंदुस्थान नगरमधील एका फार्म हाऊसमध्ये आरोपी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांची ती कथित पार्टी झाली होती. दरम्यान, ज्या ठिकाणी ही पार्टी झाली आहे ते फार्म हाऊस हे बडगुजर यांच्या नातेवाईकांचेच असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे आणि याचमुळे आता सुधाकर बडगुजर यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी बडगुजर यांची काल देखील तब्बल दोन तास चौकशी केली. (Sudhakar Badgujar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम