Sudhakar Badgujar | सुधाभाऊंची आज ‘मोठी’ चौकशी; काय खुलासे होणार..?

0
31
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

Sudhakar Badgujar |    सध्या संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणारे प्रकरण म्हणजे ‘सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता पार्टी’ प्रकरण ह्या प्रकरणामुळे सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभरात चर्चेत आले.  दरम्यान, यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नाशिक महापालिकेतील पदाचा  गैरवापर तसेच अपहार, फसवणूक आणि बनावट दस्तऐवज या प्रकरणी नाशिक महानगर पालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हे आरोप फेटाळून लावताना बडगुजर म्हणाले की, ‘ जर माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी आधिक्षकांच्या कार्यालयातच फाशी घेईल.” अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सर्व आरोप हे फेटाळून लावेल. दरम्यान, याच प्रकरणी आज सुधाकर बंडगुजर यांची आज लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात विशेष चौकशी केली जाणार आहे.

Pratap dada news: प्रतापदादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी- भुसे

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात सुधाकर बडगुजर यांच्यावर  गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी बडगुजर यांच्यासह आणखी दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा अपहाराचा गुन्हा दाखल केला. दारमेण, या प्रकरणी २०१६ मध्ये सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात तत्कालीन महानगर पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी  तक्रार अर्ज दाखल केलेला होता.

दरम्यान, या प्रकरणी २०१६ पासून चौकशी सुरू होती. हा तपास संपल्यानंतर सुधाकर बडगुजर, साहेबराव शिंदे आणि सुरेश चव्हाण ह्या तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक महानगरपलिकेत नगरसेवक ह्या कार्यरत पदावर असताना महापालिकेतील कुठलाही कामाचा ठेका घेता येत नाही. मात्र, बडगुजर यांनी एका कंपनीला महापालिकेच्या कामाचा ठेका मिळवून दिला होता.

Pune Crime | भाडेकरुनेच केला घात; ६ वर्षे अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

तसेच त्यांनी स्वत: ह्या संबंधित कंपनीच्या मार्फत २००६ ते २००९ या वर्षांत तब्बल ३३ लाख ६९ हजार ४३९ रुपये स्वीकारले आणि पदाचा गैरवापर करत स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतल्याचा हा प्रकार आहे. या प्रकरणी, “आपण कोणताही अपहार केलेला नसून, आपल्याला जाणीवपूर्वक यात रोवले जात असल्याचा दावा बडगुजर यांनी केला आहे.

या प्रकरणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुधाकर बडगुजर यांच्या बडगुजर अँड बडगुजर ह्या कंपनीच्या स्थापनेपासूनच्या आर्थिक बाबीची चौकशी सुरू असून, या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याच्या प्रकरणाच्या तपासाच्यावेळी ते कोणकोणती पुरावे सादर करतील आणि यातून आता कोणते गौप्यस्फोट होतात. याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here