Dindori : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक लाचखोरांवर एसीबीने कारवाई केली असून आता आणखी एक मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार हा तब्बल ४० लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या हाती लागल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
एका खासगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी निलेश अपारने तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितली होते. याबाबत एसीबीला माहिती मिळताच एसीबीने सापळा रचून अपार याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले असून सध्या अपारची एसीबीच्या पथकाकडून सुरु आहे.
दरम्यान, 23 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व लाचखोर यांच्याविरुध्द धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात सुमारे 90 गुन्हे दाखल करून तब्बल सुमारे 130 आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम