मराठा आरक्षणाची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कोकणगावमध्ये मराठा समाजाने गुरुवारी (दि. 2) नोव्हेंबर रोजी साखळी उपोषण आणि भव्य दिव्य अशी कॅण्डल मार्च रॅली कोकणगाव फाटा हनुमान मंदिरा पर्यंत काढण्यात आली होती.
कोकणगाव फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसाची साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
देवळा तालुका दुष्काळी जाहीर न झाल्याने उद्यापासून काँग्रेस करणार आमरण उपोषण
यावेळी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी उपोषणाच्या ठिकाणी भजनाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मोठ्या संख्येने या उपोषणाला सर्व समाजाचे बांधव उपस्थित होते आणि महिलादेखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मराठा आरक्षणासाठी सरकारने तात्काळ एक दिवसाचे अधिवेशन बोलावून त्या अधिवेशनात तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि न लावल्यास कोकणगाव साकोरे शिरसगाव वडाळी नजीक येथील मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीने रोको रोको करण्यात येणार आहे.
कसमादे | कांद्याची कोटींची उड्डाणं घेणाऱ्या कसमादेवर कांदा न पिकवण्याची वेळ!
संदीप रामराव मोरे, रामराव गायकवाड, केशवराव मोरे, माणिकराव सरोदे, भाऊसाहेब मोरे, भास्करराव मोरे, रमेश मोरे, भारत मोरे, नाना गायकवाड, दिपक लोकणार, शरद गायकवाड, सोमनाथ बोराडे, त्रिभुवन गायकवाड, राजेंद्र बैरागी, शामभाई सैय्यद, दत्तुपंत गायकवाड, वाळू मोरे, विश्वास मोरे, सोमनाथ मोरे, शांताराम मोरे, दिलीप मोरे, दिलीप शिवराम मोरे, लक्ष्मण जाधव, अनिल गायकवाड, रविंद्र मोरे, गोविंदराव गायकवाड, विक्रम मोरे, बापूसाहेब मोरे, शरद मोरे, सुरेश गायकवाड, रमेश दळवी, रामचंद्र गायकवाड, साहिल मोरे, यश गायकवाड, अविनाश मोरे, माणिक मोरे, शांताराम मोरे, दिलीप गायकवाड, प्रकाश गायकवाड, हर्षल मोरे, प्रतिक मोरे, सुनिल बोरस्ते, कैलास बोरस्ते, संदीप शिंदे, जयराम मोरे, अनिल गायकवाड, आनंता आवारे, चेतन मोरे, धनंजय मोरे, सागर मोरे, रोहित मोरे, प्रकाश मोरे, नितिन मोरे, अतुल गायकवाड, सिद्धार्थ बागुल, सरपंच सौ. सुरेखा मोरे, उपसरपंच पुनम गायकवाड, विमल मोरे, ताराबाई मोरे, अनिता सताळे, वंदना मांढरे सकल मराठा समाजाचे महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम