Nashik News | नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालय प्रशासनाने चक्क एका जिवंत महिलेला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील ‘कारभार’पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. कागदपत्रांची अदलाबदल झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. पण काही तास का असेना बेवारस मृत वृद्ध महिलेला ओळख मिळाली होती. दरम्यान, चुक लक्षात आल्याने मृत वृद्धेची ओळख पुन्हा बेवारस म्हणून करण्यात आली.
नाशिकरोड बसस्थानकात ६५ वर्षीय वृद्ध महिलेला शुक्रवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वृद्ध महिलेची ओळख पटली नव्हती. दरम्यान, वृद्धेचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे.
त्यामुळे रुग्णालयाने यासंदर्भात नाशिकरोड पोलिसांना कळवले होते. यासाठी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे महिलेचे नाव आणि कागदपत्रे सोपवली. त्यानुसार पोलिसांनीही महिलेच्या मृत्यूची नोंद केली. पण, ज्या वृद्धेच्या नावाने मृत्यूची नोंद केली आहे. ती रुग्ण महिला जिवंत असल्याचे काही वेळानंतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पुन्हा नवीन कागदपत्रे तयार केली व मृत वृद्धेची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली.
Maratha Reservation | नाशिक जिल्ह्यात सापडल्या आठ हजार मराठा-कुणबी नोंदी
बेवारस वृद्धेस ज्या महिलेचे नाव देण्यात आले, तिच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. ही बाब लक्षात येताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर नव्याने कागदपत्र मृत महिला अनोळखी आणि जिवंत महिला उपचार घेत असल्याचा उल्लेख करण्यात आला.
अनुसया सीताराम माळी ह्या महिला ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान (शितळादेवी, अमरधाम, भद्रकाली) येथे अशक्तपणा आल्यामुळे बेवारस अवस्थेत आढळून आल्या. त्यांना रुग्णवाहिकेमार्फत ४ नोव्हेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.अनोळखी मृत महिलेचे नाव हे अनुसया माळी असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या संबंधितांनी आरोग्य यंत्रणेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यानुसार वैद्यकीय यंत्रणेने शवविच्छेदनासाठी कागदोपत्री नोंदी केल्या. त्यानुसार पोलिसांनीही पंचनामा केला. दरम्यान, मृत महिलेच्या नावातच चूक असल्याचे समोर आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम