Crime news | भगूर येथे ग्रामदैवत श्री रेणुका देवी संस्थानातर्फे यात्रेचे आयोजन केले जाते. दरम्यान, ह्या यात्रेत मजा करण्यासाठी पैसे हवेत म्हणून २३ ऑक्टोबरला मध्यरात्री सिन्नर- घोटी महामार्गावरील आगासखिंड येथील एका भंगार व्यवसायिकाच्या दुकानातली ७५ हजार रुपये रोख रोकड आणि मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
याच गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी तीन विधी संघर्षित बालकांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आगासखिंड येथील अमित स्क्रॅप सेंटर ह्या दुकानातून मध्यरात्रीच्या सुमारास दूकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ७५ हजार रूपयांची रक्कम आणि दुकान मालकाचा मोबाईल फोन चोरीला गेला होता. याप्रकरणी, सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाचा पहिला बळी चांदवड तालुक्यात..
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे ह्या गुन्ह्याचा तपास करीत होते. सदर चोरी लहवित (ता. नाशिक) येथील आदीत्य सुधीर सौदे आणि त्याच्या साथीदारांनी केलेली असुन ते सध्या औंध (पुणे) येथे निघुन गेल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार गून्हे शाखेच्या पथकाने औंध येथून आरोपी आदित्य सौदे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, नंतर तपासा दरम्यान, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर चोरी ही अनिकेत अनिल उमाप (रा. भगुर) आणि त्याच्या पुणे येथील तीन मित्रांसोबत केल्याचे त्याने सांगितले.
हे सर्वजण भगूर येथे रेणुका मातेच्या यात्रेत एकत्र आले होते. मात्र, यात्रेत मौजमजा करण्यासाठी पैसे हवेत, म्हणून त्यांनी ही चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत उमाप यास भगुर येथुन ताब्यात घेतले आहे.
Crime news | चक्क..! किल्ला नावावर करण्याची तयारी…
चोरी केलेल्या रक्कमेपैकी पंधरा हजार रुपये आणि मोबाईल फोन त्यांच्याकडून ताब्यात घेतला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे. या गुन्ह्यात आणखी तीन जणांचा सहभाग होता. पण, ते तिघेही विधी संघर्षित बालके आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांना सिन्नर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम