मुंबई : राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! यंदा ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी म्हणजेच २१ तारखेला देण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला आहे.
यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने आपल्या अख्यातरीतील कर्मचाऱ्यांना या महिन्याचा देण्याचा निर्णय आज घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने देण्याचे सूचना सर्व आस्थापनांना दिली आहेत. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.
Happy #Diwali2022 ! 🪔#Maharashtra https://t.co/ojIdaUe38a
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 18, 2022
यापूर्वी अश्या प्रकारची मागणी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती, त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षण संस्था, शाळा-महाविद्यालये आणि इतर सर्व आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना होणार आहे. यंदा २२ तारखेपासून दिवाळीला सुरूवात होणार असून त्यापूर्वीच म्हणजे २१ तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा राज्य शासनातील सर्व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क आणि गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२,५०० एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. हा अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. दिवाळी काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. याचा परिणाम हा अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूलात वाढ होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम