Skip to content

निंबोळा येथे अवैद्य गोवंश वाहतूक करणारे वाहन जमा


देवळा : देवळा तालुक्यातील निंबोळा शिवारात गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत वाहनासह सात गोवंश व एक रेडा आदी मुद्दे माल सोमवार (दि.१७) रोजी स्थानिक युवकांनी पकडला. वाहनचालक फरार झाला असून सर्व जनावरांना गोशाळेत रवाना केले . देवळा पोलिसांत वाहन जमा करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निंबोळा शिवारात पकडण्यात आलेले अवैध गोवंश वाहन समवेत स्थानिक युवक (छाया – सोमनाथ जगताप )

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवार (दि.१७) रोजी अवैद्य रित्या निंबोळा शिवारातुन गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाचा येथील स्थानिक युवकांनी पाठलाग करून वाहन क्रमांक (एमएच ०४ इबी ०९४५) अडवले. या वाहनात सात गोवंश व एक रेडा निर्दयपणे दोराने बांधून कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे वाहतूक करताना दिसून आले. या घटनेची देवळा पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला .

अवैद्य रित्या गोवंश वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी वाहनचालक फरार असून सर्व जनावरे व वाहनासह एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जाम करण्यात आला. मालेगाव येथील मच्छिंद्र शिर्के यांनी फिर्याद दाखल असून पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.आर.देवरे, चव्हाण पुढील तपास करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!