पुणे विद्यापीठाच्या ‘स्वररंग २०२२’ जिल्हास्तरीय युवक महोत्सवाला सुरुवात

0
34

नाशिक : येथील रावसाहेब थोरात सभागृहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केटीएचएम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वररंग २०२२’ जिल्हास्तरीय युवक महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली.

या महोत्सवात जिल्ह्यातील ५० महाविद्यालयांमधील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून विविध कलांचे सादरीकरण काल पार पाडले. मविप्रचे उपसभापती देवराम मोगल यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायन, वादन, लोक वाद्य, नृत्य, अभिनय, यांसह नकला, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, मेहंदी, माती कला व यांसारख्या एकूण ३५ कला प्रकारांचे बहारदार सादरीकरण केले होते.

यावेळी देवराम मोगल म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी कलागुण दडलेले असतात. हे कलागुण विकसित करण्यासाठी विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगला रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने या क्षेत्रात पारंगत होऊन आपली प्रगती साधावी, असे सांगत त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक लक्ष्मण लांडगे यांनीही महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्यात.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले असून, सूत्रसंचालन कला मंडळप्रमुख डॉ. तुषार पाटील, तर युवक महोत्सव समन्वयक डॉ. गणेश मोगल यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर संचालक लक्ष्मण लांडगे, एस. के. शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, व परीक्षक आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here