Snake in matoshree : राऊतांपाठोपाठ ठाकरेंच्याही घरी सापांचा वावर ; तब्बल चार फुटांचा कोब्रा आढळल्याने खळबळ

0
11

Snake in matoshree : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर अतिशय विषारी समजला जाणारा कोब्रा जातीचा नाग आढळून आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास काही शिवसैनिकांना हा साप आढळून आल्यानंतर सर्व मित्रांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले आणि हा नाग सुरक्षितरीत्या पकडण्यात आला.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानामध्ये सर्प आढळून आल्याची घटना घडली होती. यावेळी प्रसंगावधान राखत सर्प मित्रांना पाचारण करून या ठिकाणाहून या सापाला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं होतं. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी कोब्रा जातीचा नाग सापडला आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही शिवसैनिकांना या ठिकाणी साप असल्याचे निदर्शनास आलं व त्यांनी तातडीने सर्पमित्रांना पाचारण केले.

https://thepointnow.in/reel-competition/

दरम्यान सर्व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतात त्यांनी मातोश्री निवासस्थानी असलेल्या पाण्याच्या टाकी मागून चार फूट लांब नाग शिताफिने पकडला व त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. शिवसैनिकांना हा साप आढळून आल्यानंतर त्यांनी आपत्कालीन क्रमांकावर फोन करत सर्पमित्रांना पाचारण केले होते आणि या सापामुळे कुणालाही इजा होऊ नये किंवा सापाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी उपाययोजना देखील करण्यात आल्या होत्या.(snake in matoshree bungalow)

आपल्या निवासस्थानाच्या परिसरात साप आढळून आल्याची माहिती मिळताच उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांनी या घराबाहेर धाव घेतली होती आणि याचा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर पसरत आहे.(snake in matoshree bungalow)

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जमिनीखाली तयार होणाऱ्या उष्णतेमुळे सरपटणारे प्राणी आपले वेळ सोडून इतरत्र आढळून येतात. काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये असलेल्या नवीन नाशिक परिसरातून केवल पार्क या ठिकाणाहून एका घरामधून तब्बल चार कोब्रा जातीच्या नागांची पिल्ल पकडण्यात आली होती. या पाठोपाठ संजय राऊत यांच्या घरी देखील सापाचा वावर असल्याचे आढळून आलं होतं. (snake in matoshree bungalow)

अशा अनेक घटना नेहमी समोर येत असतात मात्र साप आढळून आल्यास त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्रांना पाचारण करूनच त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडायला हवे जेणेकरून त्यांच्या आणि मानवाच्या देखील जीविकास धोका निर्माण होणार नाही.(snake in matoshree bungalow)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here