Reel competition : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच आपण रील कॉम्पिटिशन घेणार असल्याचं जाहीर केल आहे. आणि यासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा बक्षीसही देणार असल्याचं त्यांनी सांगितल आहे.(Reel competition)
आपला आक्रमक आणि वेगळ्या भूमिकेसाठी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला वाढदिवस साजरा न करता अध्यात्वासात जाण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी रविवारी ठाण्यातील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला हजेरी लावत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि एका अनोख्या स्पर्धेची त्यांनी यावेळी अनौपचारिक घोषणा देखील केली आहे.(Reel competition)
https://thepointnow.in/rain-update/
इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून रिल्स किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवून आपलं मत समाजासमोर व्यक्त करण्याचा नवा ट्रेंड सध्या रुजला आहे. या ट्रेंडला तरुण वर्गाकडून मोठी पसंती दिली जाते आहे व फॉलो करत व्हिडीओज बनवले देखील जातात. मात्र यामुळे अनेक घटना संदेश देखील समोर येत असतात आणि समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओज मुळे अनेकदा त्याचा इम्पॅक्ट झाल्याच देखील बघायला मिळतं आहे. याचीच दखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात आणि मणिपूर मध्ये घडणाऱ्या घटनांचे दाखले देत विद्यार्थ्यांना याविषयी बोलण्याचं आवाहन केलं आहे.(Reel competition)
नेमकं काय म्हटले जितेंद्र आव्हाड
“तुम्ही रिल्स बनव्हतं नसाल तर तुम्ही त्या करायला सुरुवात केली पाहिजे, कारण आता लोकांपर्यंत पोहोचण्याचं, एखाद्या विषयावर स्पष्टपणे व्यक्त होण्याच ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम हे सर्वोत्तम माध्यम आहे. याशिवाय मी स्वतः सुद्धा आता रील स्पर्धा भरवणार असून यात सर्वोत्तम रील करणाऱ्या स्पर्धकाला मी १० लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे”(Reel competition)
गेल्या काही वर्षांत आपला व पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक नेतेमंडळी व पक्ष सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येताय. काही दिवसांपूर्वी मनसे कडून रील बाज असा अवॉर्ड सोहळा सुद्धा घेतला. कित्येक पक्ष रिल्स बनवून आपल्या पक्षाला तळागाळात पोहचवत आहेत. आपल्या पक्षाच्या आणि वैयक्तिक प्रचारासाठी सुद्धा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्सची मदत देखील घेतली जाते. यातच या माध्यमातून आता स्पर्धा भरवत जितेंद्र आव्हाड यांनी दहा लाखांचे बक्षीस देण्याची अनौपचारिक घोषणा केल्याने रील स्टार्स मध्ये चर्चेला सुरवात झाली आहे (Reel competition)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम