जळगाव मध्ये बीएचआर खंडणी प्रकरणी SIT चा समावेश

0
17

जळगाव : BHR पतसंस्थाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात मदतीसाठी खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील ऍड.प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केलेली आहे.या पथकात दोन अधिकाऱ्यासह चार कर्मचारी आहे.बीएचआर पतसंस्था अफरातफर प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी खंडणी मागितल्याने सूरज सुनील झंवर (३२, रा.जळगाव)यांनी याबाबत डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये १ कोटी २० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिलेली होती. डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात ऍड. प्रवीण पंडित चव्हाण, शेखर मधुकर सोनाळकर ,उदय नानाभाऊ पवार हे संशयित आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.खंडणीची रक्कम चाळीसगाव येथे देण्यात आल्याने हा गुन्हा पुण्यातून जळगाव पोलिसांकडे ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेमार्फत करण्याचा निर्णय झाला.त्यानंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचे (SIT)बोलावण्यात आले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक,दोन हवालदार व पोलीस नाईक आहेत.

नाशकात ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतमोजणीला झाली सुरुवात

विशेष तपास पथकात पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हे. कॉ. विजय पाटील, नरेंद्र वारुळे, पोलीस नाईक नाईक जीवन पाटील व मनोज सुरवाडे यांचा समावेश आहे.या सहा जणांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येणार आहे.पथकाने गेल्या आठवड्यात फिर्यादीचे वडील सुनील झंवर यांना एक पत्र दिले.जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याविषयी पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार दि. १ फेब्रुवारी रोजी झंवर यांचा जबाब SIT पथकाने नोंदविला आहे.झंवर यांच्याकडून काही पुराव्यांसह दस्तऐवजही SITने ताब्यात घेतले आहेत.
गुन्ह्यातील फिर्यादीचा फेर जबाब नोंदविण्यासाठी देखील बोलाविण्यात आले असून २-३ दिवसात तो नोंदविला जाणार असल्याची माहिती आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here