Shocking news | पोटच्या तरुण मुलीसाठी बापच नाही तर आईही ठरली वैरीन

0
39
Sambhaji Nagar
Sambhaji Nagar

Shocking news |  पोटची लेक म्हणजे वडिलांचे काळीज तर, आईची सावली असते. मुलगी जसजशी मोठी होते तसतसे आईवडील तिला आणखी जपत असतात. मुलीसाठी वडील तर, वाडिलांसाठी मुलगी म्हणजे हळवा कोपरा असते. तरुण मुलगी म्हणजे आईवडिलांची चिंता असते. तिच्यावर कुणाचीही वाईट नजर पडू नये, यासाठी ते तिला नेहमी जपत असतात. पण, हेच पालक जर मुलीचे वैरी झाले तर…(Shocking news)

असंच एक संतापजनक प्रकरण हे भंडाऱ्यातून समोर आले आहे. भंडार जिल्ह्यातील साकोली ह्या तालुक्यातील वडद या गावातील ही घटना असून,पीडित मुलगी ही साकोली तालुक्यातील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान, अंतर जास्त असल्याने गावातून रोज ये-जा करण्यासाठी तिला खूप वेल लागत होता. त्यामुळे ती शिक्षणासाठी तिच्या तिच्या काका काकूंसोबत साकोली येथेच राहत होती. तसेच येथेच राहून ती तिचे शिक्षण पूर्ण करत होती. मात्र, काही दिवसांनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिला गावी बोलावून घेतलं.(Shocking news)

Sudhakar Badgujar | सुधाभाऊंची आज ‘मोठी’ चौकशी; काय खुलासे होणार..?

दरम्यान, बऱ्याच दिवस झाले पण, मुलीसोबत बोलणे न झाल्याने तिच्या काका काकूने तिला १४ डिसेंबर रोजी फोन केला असता, यावेळी तिने जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ह्या १७ वर्षीय मुलीसोबत तिच्याच जन्मदात्या आईवडिलांनीच शत्रूही करणार असे कृती केले आहे. यावेळी हा सर्व पीडित तरुणी कथन करीत असताना ते ऐकून तिच्या काका काकूंनाही मोठा धक्का बसला. पण ते दोघे आपल्या पुतणीच्या मदतीला देवासारखे धावून आले.

नेमकं प्रकरण काय..? | (Shocking news)

पीडित अल्पवयीन मुलीच्या काकूने साकोली पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईवडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, फक्त पैशांसाठी जन्मदात्या आईवडिलांनी पोटच्या मुलीलाच तिच्यावर जबरदस्ती करत देह विक्री करायला बसवले. आधी ओळखीच्या आणि नंतर अनोळखी व्यक्तींसोबतदेखील तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. या काळात त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींकडून तिला सामूहिकरित्या शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, कालांतराने हा सर्व प्रकार पुढे वाढत जात, तब्बल महिनाभर तिच्यावर कधी एकट्याने तर कधी सामूहिकरीत्या बलात्कार करण्यात आले.(Shocking news)

Pune Crime | भाडेकरुनेच केला घात; ६ वर्षे अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

आणि याही पेक्षा धक्कादायक म्हणजे हे सर्व तिच्या आईवडिलांच्या डोळ्यांदेखत सुरू होतं. पण, ते तिला वाचवण्या ऐवजी पैसे मोजण्यात व्यस्त होते. हा सर्व प्रकार कधी साकोली तर कधी इतर ठिकाणी तिला जाबरदशतीने नेत केला गेला. या दरम्यान, पीडित मुलीला बेदम मारहाण करत तिच्यावर शारीरिक तसेच लैंगिक अत्याचार देखील करण्यात आले. अंत ह्या प्रकरणी पीडित मुलीच्या काका-काकुच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिल, आणि एका महिलेसह एकूण सहा जणांना ताब्यात घेतले आहे.  यातील एक आरोपी हा फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.(Shocking news)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here