Shivsena UBT | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली असून युती आणि आघाडीकडून जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी महायुतीकडून 10 मोठ्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये लाडकी बहिणी योजनेतील रकमेच्या वाढीसह शेतकऱ्यांसाठी विविध घोषणांचा समावेश होता. यानंतर काल महाविकास आघाडीने आपली पंचसूत्री जाहीर केली असून यात सरकार आल्यास महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वचननामा प्रकाशित केला गेला आहे. यामध्ये त्यांनी मुंबईकरांच्या महत्त्वाच्या बाबींवरती विशेष लक्ष दिले आहे.
Shivsena UBT | अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर!
“2020 साली दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली”
यावेळी उद्धव ठाकरे यांनी, “निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून काल मविआची सभा पार पडली. आम्ही मतं मागायची अन् लोकांनी ती द्यायची. असा आम्हाला पटत नाही. लोकांनी आम्हाला मतं का द्यायची? काल आम्ही पंचसूत्री जाहीर केली असून त्यानुसार, काही दिवसात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होईलच परंतु काही बारीक-सारी गोष्टी आहेत ज्या शिवसेनेच्या वचननाम्यात आहेत” असे म्हटले. त्याचबरोबर, “2020 साली पालिका निवडणुकीच्या वचननाम्यात मुंबईसाठी सागरी मार्गाचे आश्वासन दिले होते. मला अभिमान वाटतो ती आश्वासनं आम्ही पूर्ण करून दाखवले. मालमत्ता कर माफ करण्याचेही आश्वासन आम्ही पूर्ण करून दाखवली. शिवभोजन थाळी सुरू केली. हा वचननामा दोन प्रकारात असेल यात फार काही वेगळेपणा नाही परंतु थोडीफार वचने दिली आहेत. मविआच्या इतर पक्षांना देखील हा वचननामा मान्य आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले.
कोळीवाड्यांचे अस्तित्व त्यांची ओळख आम्ही कदापी पुसू देणार नाही
पुढे बोलत, “धारावीत आम्ही वित्तीय केंद्र उभारू तसेच तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देऊ. गृहनिर्माण धोरण तयार करू मुंबईतील व महाराष्ट्रातील कोळीवाडे आणि गावठाण यामध्ये कोळी बांधव काही गावठाण यांच्यावर आता सरकारची वाकडी नजर आहे. या कोळीवाड्यांचा क्लस्टर किंवा डेव्हलपमेंट करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय तर सगळं एकत्रित करायचे त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राच्या घशात घालायची. असा हा एक काळा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे त्यांनी पहिला केलेला जीआर रद्द करून कोळीवाड्यांचे अस्तित्व त्यांची ओळख आम्ही पुसू देणार नाही. या लोकांना मान्य होईल असाच विकास आम्ही त्या ठिकाणी करू” असे आश्वासन यावेळी दिले आहेत.
Shivsena UBT | अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर!
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा पुढीलप्रमाणे:
* शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देता गहू तांदूळ डाळ तेल व साखर या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवणार.
* प्रत्येक जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य देखणे व प्रेरणादायी मंदिर उभारणार
* प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.
* महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला जात पात न पाहता मुलींप्रमाणे मोफत शिक्षण पुरवणार.
* सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणार.
* महिला राज्यातील महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार, प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबर स्वतंत्र 247 महिला पोलीस ठाणे सुरू करणार तसेच अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या वेतनात वाढ करणार.
* वंचित समूह वंचित समूहांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार.
* बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करून निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना हटवून पर्यावरण स्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.
* ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पिकाला हमखास भाव मिळवून देणार.
* धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह त्याच जागी राहतं घर देणार.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम