Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीची गॅरंटी; महिलांना दरमहा 3000 रुपये देणार! 

0
57
#image_title

Mahavikas Aghadi | राज्यभरात विधानसभा निवडणुकांची धुमाळी सुरू झाली असून राज्यात सर्वत्र ठिकठिकाणी प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची एकत्रित सभा पार पडली. या सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या सगळ्यात महाविकास आघाडीने आपल्या 5 महत्त्वाच्या गॅरंटी जाहीर केल्या आहेत.

Mahavikas Aaghadi | मविआतील नाराजी पुन्हा चव्हाट्यावर; नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

काय आहेत महाविकास आघाडीच्या पाच गॅरंटी?

* सत्तेवर आल्यास महाविकास आघाडी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास देणार आहे.

* तसेच शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत ची कर्जमाफी व नियमित कर्ज फेडीसाठी 50000 रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

* जातीनिहाय जनगणना करून 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

* 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषध दिली जाणार.

* त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपयांपर्यंतची मदत करणार.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here