Shivsena UBT | उद्धवसेनेचे 15 आमदार ठरले….?; एबी फॉर्मचे वाटपही झाले.?

0
75
#image_title

Shivsena UBT | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची काल दि. 17 ऑक्टोबर रोजी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले असून बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील बहुतांश आमदारांची उमेदवारी देखील यावेळी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. “यादी जाहीर होण्याची वाट पाहू नका. तुमच्या बाबतीत ती सर्व औपचारिकता आहे.” असे म्हणत या बैठकीत विद्यमान आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली असून 22 ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना या उमेदवारांना देण्यात आले आहेत.

Shivsena UBT | ‘हे’ आहेत ठाकरेंच्या सेनेचे लोकसभेचे उमेदवार..?

पक्षप्रमुखांकडून आमदारांना एबी फॉर्मचे वाटप

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबर पर्यंतचे मुदत देण्यात आली आहे. यामुळे महायुती व महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर करून उमेदवारांना प्रचारासाठी मैदान उतरवले जाणार आहे. तेव्हा आजच विद्यमान आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षप्रमुखांकडून एबी फॉर्म दिले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Shivsena UBT MNS Clash | ‘उठ दुपारी घे सुपारी’; मनसे-ठाकरे गटाचा राडा

मविआचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार

या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार उपस्थित होते. त्यातील बहुतांश आमदारांचे विधानसभा निवडणुकीचे तिकीट निश्चित झाल्याची माहिती असून त्या आमदारांनी एखादा दिवस ठरवून एबी फॉर्म घेऊन जायचे आहे. हे आमदार त्या दिवशी एबी फॉर्म घेऊन जातील अशी माहिती आहे. तर येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे विशिष्ट मंडळ आज राज्य निवडणूक आयोगाला भेटणार असून लोकसभा निवडणूक ज्या काही त्रुटी महाविकास आघाडीतील पक्षांना जाणवल्या, त्या दृष्टिकोनातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचे निवारण राज्य निवडणूक आयोगाने करावे या उद्देशाने ही भेट घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here