“बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर तुम्हाला लाभले असते, तर…”; संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

0
13

शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते माध्यमांशी बोलताना असे म्हटले, “कितीही भ्रम निर्माण केला तरी या राज्याची जनता ते स्वीकारणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर तुम्हाला खरोखरच लाभले असते तर आपण राज्याचे मुख्यमंत्री असता, मात्र आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसावं लागतं. बाळासाहेब ठाकरेंचं नाव ही एक आग आहे. त्या आगीशी खेळू नका.”

संजय राऊत म्हणाले, “ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला, त्यांचे नुसते हात पोळलेले नाही, तर त्यांची राजकीय कारकीर्द देखील पोळलेली आहे. त्यामुळे हे जे आमचे आमदार तुम्ही कैद करून ठेवलेले आहेत किंवा तुमच्या ताब्यात ठेवलेले आहेत त्यांचा निर्णय जनता घेईल. त्यांच्याविषयी बोलणं आता आम्ही थांबवलेलं आहे, कारण आता ते महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघात जायचं आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असेल, तर तो त्यांना लखलाभ ठरो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढे घेवून जावू आणि हीच शिवसेना भविष्यात या राज्याचं नेतृत्व करेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो.”

तसेच, “महाराष्ट्राच्या मातीत कधी ढोंगीपणाला, खोटेपणाला स्थान दिलं गेलं नाही, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या पाठीत आतापर्यंत अनेकांनी अशाप्रकारचे वार केलेत, परंतु ते वार पचवून शिवसेना उभी आहे. आजही भाजपला महाराष्ट्रात स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी तेव्हाही बाळासाहेब ठाकरे लागले, आजही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले शिवसैनिक मुख्यमंत्री पदापासून ते विधानसभा अध्यक्ष पदापर्यंत बसवावे लागतात. यातच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्व अधोरेखीत होतंय.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here