सेनेचा व्हीप शिंदेगटाने धुडकावला; नार्वेकर विजयी


मुंबई; विधानसभा अध्यक्ष निवडणूकीत भाजपाचे नार्वेकर विजयी झाले असून सेनेचे साळवी पराभूत झाले आहेत. चेतन तुपे यांनी राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला तर चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव मांडला आहे.

राज्यात सद्या राजकिय भूकंप झालेला असून मोठ्या प्रमाणात त्याचा फटका शिवसेनेला बसला आहे. यामुळे नेमकी सेना कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. हात वरती करून मतदान घेण्यात आले मात्र त्यात गोंधळ उडाल्याने पोलची मागणी करण्यात आली यावेळी नार्वेकर यांना- 164 मतदान तर साळवी यांना – मतदान झाले.

महाविकास आघाडीला मोठा धक्का असून शिंदेगट भाजपा सोबत गेल्याने त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसले आहे. शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नसून तो धुडकावला आहे. यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा नेमक कोणाला भोवणार हे बघण महत्वाचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!