नाशिक प्रतिनिधी – शिवसेनेचे नाशिक मध्य विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर काल रात्री शहरातील वर्दळीच्या एमजी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. ते सध्या जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवसेनेचे पदाधिकारी निलेश उर्फ बाळा कोकणे हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने प्रवास करत होते. त्याचवेळी एमजी रोडवरील यशवंत व्यायामशाळा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर व पाठीवर धारदार शस्राने सपासप वार केले आणि ते खाली कोसळले. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात तत्काळ दाखल केले. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले व अधिक तपास करत आहेत. कोकणे यांच्यावर हल्ला का झाला याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी ह्या हल्ल्यामागे सेनेतील अंतर्गत वादाचा याच्याशी काही संबंध आहे का ? याची पडताळणी पोलीस यंत्रणा करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम