“दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार !” उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

0
8

मुंबई – दसरा मेळाव्यावरुन एकीकडे दोन्ही गटांत वाद पेटला आहे. शिंदे गट व ठाकरे गट आगामी दसरा मेळाव्याकरता जोरदार तयारी करत आहेत. अशातच शिंदेगटाने काही दिवसांपुर्वी शिवतीर्थावरचा दसरा मेळावा आम्हीच घेणार असल्याचे म्हणत ठाकरेंना आव्हान दिले होते. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसैनिकांना मेळाव्याच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे दसरा मेळावा कोणाचा, यावरून आता मोठे राजकीय वादळ उठणार आहे.

उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनात विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दसरा मेळाव्यासंदर्भात अनेक नेत्यांसोबत सूचना करत यंदाचा शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार ! त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता सर्व महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिकांना सोबत घ्या आणि तयारीला लागा, असा आदेश दिला आहे.

यादरम्यान, उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना फोडण्याआधी त्याचा इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले हे नेते तोतया आहेत, ही जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल. तसेच सोबत विभागप्रमुख, उपविभागप्रमुख असल्याने माझा आत्मविश्वास दुणावल्याचे म्हटले असून शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचेही आदेश यावेळी त्यांनी दिले.

तसेच वेदांत-फॉक्सकाॅन प्रकल्पावर सुरू असलेल्या राजकीय वादावर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना म्हटले, हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले. पण सध्याच्या सरकारमुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here