Skip to content

श्रीकृष्ण अर्जुनाला जिहाद सांगायचे – शिवराज पाटील यांचे वादग्रस्त विधान


दिल्ली : माजी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी एका कार्यक्रमात यांनी गीतेची तुलना जिहादशी करत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. तसेच महाभारत ग्रंथामध्ये सांगण्यात गीतेचा भाग समाविष्ट आहे, असे म्हणत फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे, अशा आशयाचे वक्तव्य शिवराज पाटील यांनी केले आहे. पाटील चाकूरकर यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

दरम्यान, या विधानावर भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी कॉंग्रेसवर टीका करताना  म्हणाले, की या सगळ्यांमध्ये इटालीयन विचारधारा रुजवलेली आहे, कॉंग्रेसने नेत्यांचे डिएनए इटालीयन करून घेतले आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या संस्कृती, दैवतांची विटंबना करण्याच्या वृत्तीची लाज वाटते, असे ते म्हणाले आहेत.

तर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवराज पाटील यांची बाजू घेत म्हणाले, की भाजप नेत्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची लाज वाटते. कारण जिहादचा अर्थदेखील माहित नाही. जिहादचा खरा अर्थ संघर्ष आहे, स्वतःच्या शुद्धीसाठी केलेला संघर्ष यालादेखील जिहाद म्हटले जाते. धर्म-अधर्माविरोधच्या लढाईला देखील जिहाद म्हटले जाते, असे म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले शिवराज पाटील चाकूरकर ?

शिवराज पाटील यांनी जिहादबद्दल बोलताना असे म्हणाले, की मनात कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगते गोष्टी योग्य आहेत. तर दुसरे मन सांगते गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेले आहे. असे म्हणत, श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!