मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आगामी काही दिवसात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु संधी साधत दोघांच्याही आधी आमदार रोहित पवार आज अयोध्या गाठणार आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचीच चर्चा सुरू आहे. रोहित पवार अयोध्या दौऱ्यावर कसे असा प्रश्न आता निर्माण झाला.
राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन राजकीय वादंग सुरु असताना रोहित पवारांनी अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. रोहित पवारांनी सहकुटुंब परिवारासह दर्शनाकरिता आयोध्या घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी राजस्थान मधल्या राधा गोविंद मंदिराला भेट दिली. पुष्करचं ब्रह्मा मंदिर, सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चूस्ती यांचा अजमेर दर्गा या ठिकाणी ही भेट दिली.
या मंदिराचं आणि भारतीय संस्कृतीच कौतुक त्यांनी आपल्या सोशल मीडियावर केले आहे. या दोन्ही ठिकाणी आपण देशाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे रोहित पवार आपल्या कुटुंबियांसह अयोध्येत दाखल होतील आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहे. दोन राजकीय नेत्यांचे दौरे ठरले असताना रोहित पवार यांनी वेळ साधून अयोध्या दौरा केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम