Shirdi Temple: साईभक्तांना देणगीच्या बनावट पावत्या देऊन पैशांचा गैरव्यवहार

0
57

  1. Shirdi Temple:  शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. बनावट देणगी पावती देऊन देणगीदारासह संस्थांनाची फसवणूक केल्याचे प्रकरण. देणगीच्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याने उडाली खळबळ.शिर्डीतील साईबाबा हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज हजारो साईभक्त येत असतात. दर्शनासह साईंच्या झोळीत दान ही टाकत असतात. मात्र, याच दानात अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थांनने दाखल केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. साई भक्ताने दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन देणगीदारासह साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Salman Khan ‘Tiger 3’ Vs ‘The Marvels’; दोन्ही चित्रपट एकाच दिवशी येणार भेटीला

काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानला एक निनावी पत्र मिळाले होते. या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला एक कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना निम्म्या रकमेची बनावट पावती देत असल्याची तक्रार करण्यात आली होती. साईबाबा संस्थांनने याबाबत चौकशी केलेली असता या प्रकरणी असा प्रकार झाल्याचे समोर आलेलं आहे. देणगी कक्षात कंत्राटी कामावर असलेल्या दशरथ चासकर या कर्मचाऱ्याने अपहार केल्याचा प्रकार चौकशीत समोर आल्यानंतर साईबाबा संस्थानचे प्रभारी लेखा अधिकारी कैलास खराडे यांच्या तक्रारीवरून कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.यासंदर्भातील माहिती पोलिस निरीक्षक एस. पी. शिरसाठ यांनी दिली.

Horoscope Today 30 September: सिंह, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी काळजी घ्या

दरम्यान याप्रकरणी आरोपीला अजून काही जणांची साथ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याचबरोबर आत्तापर्यंत किती लोकांना अशा पद्धतीने बनावट पावत्या देण्यात आला याचा शोधसुद्धा आता पोलीस करणार आहेत. साईबाबांच्या झोळीत साईभक्त श्रद्धेने दान करतात. त्यामुळे साईभक्त व साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता पुढे येत आहे. आता पोलीस आणि प्रशासन याबाबत आगामी काळात काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here