देवळा ; महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हा शाखेचे अधिवेशन नाशिक येथे कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडले . यात पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून , कार्यकारिणीत अध्यक्षपदी वसंत खैरनार, सरचिटणीस पदी देवळ्याचे गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, कार्याध्यक्ष रामचंद्र बोडके तर कोषाध्यक्ष डॉ. विजय बागुल यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी विकासासाठी विविध योजना व उपक्रम यांची आखणी करून जिल्ह्यातील विद्यार्थी हितासाठी कृती कार्यक्रम राखण्यात येणार आहे . याप्रसंगी केशव तुंगार, राजेंद्रकुमार निकम, शिवाजी अहिरे , या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह माजी अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांनी संघटनेची ध्येय धोरणे तसेच आता पर्यंत झालेल्या कामकाजाचा गोषवारा सादर करीत निवड प्रक्रियेचे संचालन केले.
अधिवेशनास सुभाष राऊत ,निलेश पाटोळे,संतोष झोले, विजय पगार, प्रमोद चिंचोले, राजेश्वर आहेर, कैलास सांगळे, भाऊसाहेब ठाकरे, राजेश तायडे, खंडू सोनार, मोठाभाऊ चव्हाण, चंद्रकांत गवळी , प्रशांत जाधव, संजय कुसाळकर ,राजेंद्र नेरे, तानाजी घोंगडे, वंदना चव्हाण, नंदा ठोके, दिलीप पवार, नजीर पटेल, चित्रा देवरे ,सुनिता अहिरे, भाऊसाहेब जगताप, सुनिल मारवाडी,मंजुषा साळुंखे , लता भरसट , दिलीप नाईकवाडे, किशोर सोनवणे, कैलास पगार, शितल कोठावदे, नरेंद्र कचवे, किरण विसावे ,नेहा शिरोरे, प्रमिला शेंडगे, भाऊसाहेब सरक, कैलास बोरसे, साहेबराव निकम आदींसह मोठय़ा संख्येने शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने धडक कार्यक्रम राबविले जाणार असून, मागील कार्यकारिणीने केलेल्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त करण्यात आले . आभार नूतन सरचिटणीस सतिश बच्छाव यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम