Skip to content

Shard pawar: शरद पवारांची राजकीय निवृत्ती जाहीर; कार्यकर्त्यांचा हंबरडा, जोरदार घोषणाबाजी


Sharad Pawar : शरद पवारांनी आज अचानक धक्का तंत्र वापरून राजकीय संन्यास घेतल्यानतर कार्यकर्ते आक्रमक होत राजीनामा माघे घ्यावा यासाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. यावेळी पवारांनी धक्का तंत्र वापरले आहे.

कार्यकर्त्यांचे प्रमे बघून त्यांच्या पत्नी देखील भावूक झाल्या आहेत. कार्यकर्त्यांचा हंबरडा फोडला आहे. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, एबीपी माझा आणि एबीपी न्युजचे संपादक राजीव खांडेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनचा सोहळा पार पडला. लोक माझे सांगाती पुस्तकातील नव्या आवृत्तीत 75 पानं वाढवण्यात आली आहेत. शरद पवारांच्या 2015 ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!