Sharad Pawar | ‘व्होट जिहाद’च्या टिकेवरून शरद पवारांनी फडणवीसांना फटकारले!

0
41
#image_title

Sharad Pawar | जशी जशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसे नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीसांकडून महाविकास आघाडीवर ‘व्होट जिहाद’चा आरोप करण्यात आला. या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Sharad Pawar | निफाडध्ये ठाकरेंच्या उमेदवारासाठी पवारांची सभा; अन् भाषणात उमेदवाराचे नावही नाही..?

काय म्हणाले शरद पवार? 

लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात पराभवाला सामोरे जावे लागले होते. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील मुस्लिमांनी एकवटून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केले होते. त्यामुळेच भाजपाकडून ‘व्होट जिहाद’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक मुस्लिम यांच्या मतदानासाठी केला जात असून विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा लावून धरला जात आहे. या मुद्द्यावरून आता शरद पवारांनी भाष्य करत, “एखादा समाज जर एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान करत असेल तर त्याला जिहाद वगैरे समजण्याचे कारण नाही. कारण एक विशिष्ट समाज जो बहुसंख्येने फक्त भाजपलाच मतदान करतो. त्याला आम्ही ‘व्होट जिहाद’ समजत नाही.” असं मुद्दा खोडून काढला.

Sharad Pawar | ‘मत देण्याएवढी झिरवाळांची लायकी नाही’; शरद पवारांचे झिरवळ्यांबाबत खळबळजनक विधान

पुण्याचे उदाहरण देत दिले प्रत्युत्तर

यावेळी त्यांनी पुण्याचे उदाहरण देत, “पुण्याच्या काही भागात एक विशिष्ट समाज, जो हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केलं तर त्याची आम्हाला सवय आहे. कारण आम्हाला माहित आहे, इथे असेच मतदान होते. याचा अर्थ आम्ही त्याला जिहाद समजत नाही. ‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून या निवडणुकीला एक प्रकारे धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” असे म्हणत फडणवीसांवर पलटवार के ला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here