Political News | भाजपला पाठिंबा दिला म्हणुन वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळं फासत केली मारहाण

0
99
#image_title

Political News | भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून अपक्ष उमेदवाराच्या चेहऱ्याला काळे फासून त्यानंतर चक्क चाबकाचे फटके देत माफी मागण्याला लावल्याची धक्कादायक घटना केज राखीव मतदारसंघातील अंबाजोगाई शहरात घडली आहे.

Political News | नाशकात राज ठाकरेंना फटका; मनसेच्या उमेदवाराने हाती घेतली मशाल

नेमके प्रकरण काय? 

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज अवैध ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवण्यात आला होता. परंतु सचिन चव्हाण या अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Nashik Political | नाशकात राजकिय वातावरण तापले; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हद्दपारीची नोटीस

घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ

वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी भाजपला पाठिंबा दिला म्हणून अपक्ष उमेदवाराच्या चेहऱ्यास काळे पासून त्यानंतर चाबकाने फटके दिले, इतकेच काय तर याचा व्हिडिओ काढत, माफी माफी देखील मागायला लावली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांमध्ये अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नसून “पक्षाच्या अस्मितेला धक्का लागत असल्याने आपण ही टोकाची भूमिका घेतली.” असल्याचे शैलेश कांबळे यांनी म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here