Sharad Pawar | 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ कारणासाठी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा खुलासा

0
35
#image_title

Sharad Pawar | अजित पवारांनी, “आपला मुख्यमंत्री करायची संधी राष्ट्रवादीला मिळाली होती. या संधीचे सोनं करायला हवे होतं.” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. आता या मुद्द्यावर खुद्द शरद पवारांनी भाष्य केले असून त्याकाळी त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री का केले नाही याबाबत खुलासा केला आहे.

Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; दिंडोरीत झिरवाळांना ‘हा’ नेता टक्कर देणार

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कधीच झाले नाहीत. जे ही उपमुख्यमंत्री झाले ते आजवर मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मग ते अजित पवार असो छगन भुजबळ असो आर. आर. पाटील आणि गोपीनाथ मुंडे असो आत्तापर्यंतचा हा इतिहास आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा ही जाहीर केली असली तरी आत्ताच्या घडीला त्यांना किती संधी आहे हा प्रश्न आहे? मात्र छगन भुजबळ यांना 2004 मध्ये ही संधी होती. पण त्यांना मुख्यमंत्री केले गेले नाही.

मुख्यमंत्रीपद आपल्याकडे का ठेवले नाही याबाबत केला खुलासा

2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असताना देखील शरद पवारांनी मुख्यमंत्री पद काँग्रेसकडे दिले. तेव्हा पक्षात वरिष्ठ म्हणून छगन भुजबळ होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची चांगली संधी होती. पण त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. यावर आता शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, “राजकारणात छगन भुजबळांचा नंतरचा काळ तुम्ही बघा. त्यांना तुरुंगात जावे लागले. त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिले असते, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.” असे म्हणत शरद पवारांनी भुजबळांना मुख्यमंत्री का केले नाही या मागचा खुलासा केला.

Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; दिंडोरीत झिरवाळांना ‘हा’ नेता टक्कर देणार

नव्या नेतृत्वाला बळ देण्याकरिता ते गरजेचे होते

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला असून 2004 च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे का घेतले नाही, अजित पवारांना मुख्यमंत्री पद का दिले नाही? याबाबत विचारणा केली असता त्यांनी, “अजित पवारांचा तेव्हा मुद्दाच नव्हता.” असे म्हणत विषय संपवला. “पुढे आम्ही अधिक मंत्रीपदे घेतली. माझे अनेक तरुण सहकारी मंत्री झाले. आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार हे पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले. नव्या नेतृत्वाला बळ देण्याकरिता ते गरजेचे होते. शिवाय विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले त्यांचा पक्ष वेगळा असला तरी आम्ही सर्वजण गांधी-नेहरू विचारधारेचे पाईक असल्यामुळे ते अधिक योग्य झाले.” असे ते म्हणाले. त्याचबरोबर, “ओबीसींनाही सत्तेत स्थान मिळावे या मताचा असल्याने भुजबळांना बळ दिले.” असेही ते या मुलाखतीत म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here