Sharad Pawar | शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

0
43
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar | धुळ्याच्या शिंदखेड्यात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेती धोरणावर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणाले, “आजच्या राज्यकर्त्यांना शेतीची आस्था नाही, त्यांच्याकडून शेती संदर्भात धोरणे राबवली जात नाहीत. आपण दहा वर्ष कृषी विभागाचे काम करत होतो तेव्हा देश अन्नधान्यासंदर्भात स्वयंपूर्ण होता. सध्याचं कांद्यासंदर्भातील उदाहरण समोर आहे.

Sharad Pawar | ‘बदलापूर मध्ये कोणता राजकीय पक्ष होता?’; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

मोदी सरकारने त्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली, कांद्याला भाव मिळाला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतलेल्या कांद्यावर निर्यात बंदी आणली, कांदाच नव्हे तर गहू, तांदूळ यावर देखील बंदी घातली. जे जे तुम्ही पिकवत आहात त्यावर बंदी घालण्यात आली. मोदी सरकार शेतकऱ्यांविरोधात आहे. दहा वर्षात आम्ही केलेल्या कामामुळे भारत तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांक वर पोहोचला.

बहिणींना पैसे मिळणार पण… 

धुळ्यामधील शिंदखेडा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी, “सध्या गुंडगिरीचे राज्य सुरू आहे, सत्तेचा गैरवापर होत असून ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले नाही, रोजगार दिला नाही, तर गेल्या 20 वर्षात काहीच विकास झाला नाही. हे सरकार आता बहिणींना 1500 रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान व्हावा याकडे सरकारचे लक्ष नाही.” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

BJP vs Sharad Pawar | ‘भाजपाचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला!’; विधानसभे आधीच भाजपला मोठं खिंडार

लोकांना सत्तेचा उन्माद चढलाय

“बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. मात्र काही लोकांच्या डोक्यात सत्त्येचा माज शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय. तेव्हा त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला काढले पाहिजे. या निवडणुकीत ती संधी तुमच्याकडे आहे. ” असे देखील शरद पवार यांनी म्हटले. “तुम्ही हे राज्य महाविकास आघाडीच्या हाती द्या, महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल, अशी ग्वाही मी देतो.” असे देखील शरद पवारांनी या मेळाव्यात म्हटले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here